Join us
Daily Top 2Weekly Top 5

मोहेना कुमारी दुसऱ्यांदा झाली आई, गोंडस मुलीला दिला जन्म; मायलेकीचं जोरदार स्वागत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2024 15:48 IST

'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून मोहेना प्रसिद्धीझोतात आली होती.

'ये रिश्ता क्या कहलाता है' (Yeh Rishta Kya Kehlata Hai) मालिकेमुळे प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री मोहेना कुमारी (Mohena Kumari) दुसऱ्यांदा आई झाली आहे. मोहेनाने एका गोंडस मुलीला जन्म दिला. आजच तिला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला. मोहेनाच्या कुटुंबियांनी वाजत गाजतच आई आणि बाळाचं स्वागत केलं. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. तीन वर्षांपूर्वीच मोहेनाने मुलगा अयांशला जन्म दिला होता. आता अयांशची छोट्या बहिणीचंही आगमन झालं आहे.

मोहिना कुमारी 'रीवा'च्या रॉयल कुटुंबातील आहे. २०१९ मध्ये मोहिनाने उत्तराखंडचे कॅबिनेट मंत्री सत्पाल महाराज यांचा मुलगा सुयश रावतशी लग्न केले. सुयश बिझनेसमन आहे. 15 एप्रिल 2022 रोजी मोहिनाला पहिला मुलगा झाला. त्याचं नाव अयांश ठेवण्यात आलं. काही दिवसांपूर्वीच मोहिनाने एक डान्स व्हिडिओ शेअर करत दुसऱ्या प्रेग्नंसीची गुडन्यूज चाहत्यांसोबत शेअर केली. तर आता रावत कुटुंबात लक्ष्मीचं आगमन झालं आहे. मोहिनाच्या फॅन क्लबपेजवर व्हिडिओ शेअर करण्यात आलाय ज्यामध्ये तिचं लेकीसह कुटुंबात जोरदार स्वागत झालेलं दिसत आहे. केक कट करुन त्यांनी आनंद साजरा केलेला दिसतोय. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

मोहिनाने 'कबूल है','सिलसिला प्यार का' या मालिकांमध्येही काम केले. मात्र तिला 'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून प्रसिद्धी मिळाली. लग्नानंतर ती स्क्रीनपासून दूर झाली. मोहिना अभिनयासोबतच उत्तम डान्सरही आहे.तिने कोरिओग्राफर रेमो डिसुझासोबत काम केलंय. बऱ्याच वर्षांपूर्वी ती एका डान्स रिएलिटी शोमध्येही सहभागी झाली होती.

टॅग्स :टिव्ही कलाकारप्रेग्नंसीसेलिब्रिटीये रिश्ता क्या कहलाता है