Join us
Daily Top 2Weekly Top 5

गोड क्षण! मितालीने सासूच्या पायात घातली जोडवी, सूनेच्या डोळ्यात पाणी; Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2023 08:54 IST

सासू म्हणाली, मितालीच्या लग्नात मी तिच्या पायात...

मराठी अभिनेता सिद्धार्थ चांदेकरने (Siddharth Chandekar) आईचं दुसरं लग्न लावलं आणि त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला. उतारवयात एकटंच उर्वरित आयुष्य जगण्यापेक्षा पुन्हा जोडीदार शोधायला काय हरकत आहे ही संकस्पना हळूहळू रुजत आहे. सिद्धार्थने सुंदर पोस्ट लिहित त्याच्या आईच्या लग्नाची बातमी दिली होती. तर मिताली मयेकरनेही (Mitali Mayekar) सासूच्या लग्नात मी होते असं अभिमानाने सांगितलं. नुकतंच मितालीने सासूच्या लग्नातला एक व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केलाय जो खूपच भावूक करणारा आहे.

सिद्धार्थ चांदेकर आणि मितालीचं लग्न झालं तेव्हा सिद्धार्थच्या आईने मितालीच्या पायात जोडवी घातली होती. आता मितालीने सासूच्या पायात जोडवी घातलानाचा क्षण भावूक करणारा आहे. जोडवी घालताना मितालीलाही अश्रू अनावर झाल्याचं दिसतंय. तर तिची सासू सीमा चांदेकर मात्र कौतुकाने आज माझी सून माझ्या लग्नात मला जोडवी घालत आहे असं कौतुकाने सांगताना दिसतेय. 'माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर क्षण' असं कॅप्शन मितालीने दिलं आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

मितालीच्या या व्हिडिओवर कलाविश्वातील अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. 'खुप छान काम केलाय आदर्श आहेत दोघे ज्यांनी आईला नवीन आयुष्य दिलं तिलाही हक्क आहे स्वतःच आयुष्य जगण्याचा' अशी कमेंट एका नेटकऱ्याने केली आहे.

सिद्धार्थची आई सीमा चांदेकर यांनी वयाच्या साठीनंतर दुसरं लग्न केलं. मुलगा सिद्धार्थने आईचं हे दुसरं लग्न लावलं."आता फक्त तुझा आणि तुझ्या नव्या जोडीदाराचा विचार कर. तुझी पोरं कायम तुझ्या पाठीशी आहेत. तू माझं लग्न थाटात लावलंस, आता मी तुझं लग्न लावतोय. माझ्या आयुष्यातलं अजून एक सुंदर लग्न. माझ्या आईचं!" अशी एक सुंदर पोस्ट शेअर करत त्याने आईच्या लग्नाची बातमी दिली. तर मितालीने मी माझ्या सासूच्या लग्नात होते असं अभिमानाने सांगितलं. सध्या चांदेकर कुटुंबाचं खूप कौतुक होत आहे.

टॅग्स :मिताली मयेकरमराठी अभिनेतासिद्धार्थ चांदेकरलग्नसोशल मीडिया