Join us
Daily Top 2Weekly Top 5

#MeToo: अमिताभ बच्चन, करण जोहर तुम्ही गप्प का? भडकली बिग बॉसची ‘ही’ माजी स्पर्धक!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2018 09:52 IST

मीटू मोहिमेने अख्खे बॉलिवूड ढवळून निघाले असताना, अनेकांनी या मोहिमेला खंबीर पाठींबा दिला आहे. अर्थात काही दिग्गज स्टार्स मात्र अद्यापही या मुद्यावर चुप्पी साधून आहेत. नेमकी हीच बाब बॉलिवूडमधील काही महिलांना खटकते आहे.

मीटू मोहिमेने अख्खे बॉलिवूड ढवळून निघाले असताना, अनेकांनी या मोहिमेला खंबीर पाठींबा दिला आहे. अर्थात काही दिग्गज स्टार्स मात्र अद्यापही या मुद्यावर चुप्पी साधून आहेत. नेमकी हीच बाब बॉलिवूडमधील काही महिलांना खटकते आहे. यातील सर्वात पहिले नाव म्हणजे, बिग बॉसची माजी स्पर्धक डाएंड्रा सोर्स. होय, ‘मीटू’वर चुप्पी साधणाऱ्या दिग्गजांवर डाएंड्राने निशाणा साधला आहे. या दिग्गजांमध्ये करण जोहर, अमिताभ बच्चन, जॅकी श्रॉफ अशा अनेकांचा समावेश आहे. अलीकडे एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत डाएंड्रा या मुद्यावर थेट अमिताभ बच्चन यांना लक्ष्य केले. अमिताभ बच्चन ‘पिंक’सारख्या चित्रपटांच्या प्रमोशनसाठी अनेक ठिकाणी गेलेत, भरभरून बोलले. त्यांच्या घरातही महिला आहेत. असे असताना ‘मीटू’वर ते गप्प का? असा सवाल डाएंड्राने केला. करण जोहरवरही तिने निशाणा साधला. गर्ल पॉवरचा बाता मारणा-या करण जोहरला गर्ल पॉवरचा खरा अर्थ तरी ठाऊक आहे का? असा डिवचणारा प्रश्न तिने केला. याशिवाय जॅकी श्रॉफ यांच्यावरही ती भडकली. ताज्या मुलाखतीत ‘मीटू’वर बोलताना जॅकी श्रॉफ यांनी काहीसी वेगळीच भूमिका घेतली होती. माझ्या मित्रांवर आरोप ठेवले जात आहेत. त्यांच्यात आपआपसात जुंपली आहे, खुलासे देण्याची वेळ त्यांच्यावर आलीय, हे अतिशय खेदजनक आहे, असे जॅकी म्हणाले होते. या पार्श्वभूमीवर डाएंड्रा बोलली. आधी मी जॅकी श्रॉफ यांची चाहती होती. पण आता नाही, असे ती म्हणाली.‘मीटू’अंतर्गत अनेक महिलांनी आपआपल्या ‘मीटू’ स्टोरी शेअर केल्या आहेत. या महिलांनी बॉलिवूडच्या अनेक दिग्गजांवर खळबळजनक आरोप केले आहेत. यात आलोक नाथ, विकास बहल, कैलाश खेर, साजिद खान अशा अनेकांचा समावेश आहे.

टॅग्स :मीटूअमिताभ बच्चनकरण जोहरजॅकी श्रॉफ