Join us

Tiktok star death :२१ व्या वर्षी टिकटॉक स्टार मेघा ठाकूरचे हार्ट अटॅकने निधन; सोशल मीडियावर आहेत लाखो फॉलोअर्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2022 13:16 IST

सोशल मीडिया स्टार मेघा ठाकुर हिचे केवळ २१ व्या वर्षी निधन झाले आहे. गेल्या आठवड्यात २४ नोव्हेंबर ला मेघाने अखेरचा श्वास घेतला.

Tiktok star death : कॅनडा येथील मूळ भारतीय असलेली (Social Media) सोशल मीडिया स्टार मेघा ठाकुर हिचे केवळ २१ व्या वर्षी निधन झाले आहे. गेल्या आठवड्यात २४ नोव्हेंबर ला मेघाने अखेरचा श्वास घेतला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे मृत्युच्या चार महिने अगोदर मेघाला हृदयविकाराचा झटका येऊन गेला होता. केवळ २१ व्या वर्षी हृदयविकाराचा झटका येणे हे फारच धक्कादायक आहे. 

मेघा ठाकुर ही सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आणि टिक टॉक स्टार होती. तिचे ९३ हजार (Followers) फॉलोअर्स होते. ती फॅशन, (Body Positivity) बॉडी पॉझिटिव्हिटी अशा विषयांवर व्हिडिओ बनवत होती. एवढ्या लहान वयात निधन झाल्याने तिच्या मित्रपरिवार आणि फॉलोअर्स सर्वांनाच धक्का बसला आहे. मेघाच्या पालकांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत मुलीच्या निधन झाल्याचे कळवले आहे. 

१९ नोव्हेंबरला मेघाचा शेवटचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर दिसत आहे. मेघा खुपच टॅलेंटेड होती आणि तिला माहित होते की ती या क्षेत्रात नक्कीच यश मिळवेल. मात्र त्याआधीच २१ व्या वर्षीच तिने या जगाचा निरोप घेतला. मेघाचे इंन्स्टाग्रामवर १ लाख पेक्षा जास्त फॉलोअर्स होते.

टॅग्स :सोशल मीडियाइन्स्टाग्रामटिक-टॉकहृदयविकाराचा झटका