Join us
Daily Top 2Weekly Top 5

यशच्या घरात भाड्याने राहणार नेहा; पण 'या' अटी कराव्या लागतील मान्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2022 19:06 IST

Majhi tujhi reshimgath: बँकेने नेहाचं घर विकल्यामुळे सध्या ती बेघर झाली आहे. परंतु, या परिस्थितीमध्ये यश तिच्या मदतीसाठी धावून आला आहे.  

'माझी तुझी रेशीमगाठ' ही मालिका अल्पावधीत लोकप्रिय झालेल्या मालिकांपैकी एक आहे. या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. त्यामुळे या मालिकेविषयीचे प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. गेल्या काही दिवसांपासून नेहावर सतत संकटांचा डोंगर कोसळत आहे. यामध्येच आता नेहाचं राहतं घरदेखील तिच्या हातून गेलं आहे. बँकेने हे घर विकल्यामुळे नेहा सध्या बेघर झाली आहे. परंतु, या परिस्थितीमध्ये यश तिच्या मदतीसाठी धावून आला आहे.  नेहाला त्याने घर भाड्याने दिलं आहे. 

झी मराठीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर या मालिकेचा एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये  बँकेने नेहाचं जे घर विकलं होतं. ते घर यशने खरेदी केल्याचं दिसून येत आहे. विशेष म्हणजे याच घरात नेहा आता भाड्याने राहणार आहे.  परंतु, या घरात राहण्यापूर्वी नेहा यशसमोर काही अटी ठेवणार आहे.

परीसाठी नेहाला तिच्याच घरात राहायचं आहे. परंतु, हे घर यशने विकत घेतल्यामुळे त्याच्याच घरात भाड्याने राहणं तिला मुळीच पसंत नसतं. या घरात भाड्याने राहिलं तर वारंवार यशसोबत बोलावं लागेल असं तिला वाटतं.त्यामुळे या घरात भाड्याने राहण्यापूर्वी ती यशसमोर काही अटी ठेवते.

दरम्यान, स्वत:च्याच घरात नेहा भाड्याने राहणार असली तरीदेखील यशने केवळ घरमालक आणि भाडेकरुन हे नातं मेंटेन करावं. तसंच घराच्या कामाशिवाय अन्य कोणत्याही विषयावर बोलू नये असं नेहा खडसावून सांगते. मात्र, आता या घराच्या निमित्ताने का होईल यश पुन्हा एकदा तिचं मनं जिंकू शकेल? तिच्या मनातील गैरसमज तो दूर करु शकेल का? या प्रश्नांची उत्तर प्रेक्षकांना मालिका पाहिल्यावरच मिळतील. 

टॅग्स :टेलिव्हिजनटिव्ही कलाकार