Join us

अनिरुद्धचं बिंग फूटणार; अरुंधतीच्या घरी मध्यरात्री गेल्याचं सत्य येणार कुटुंबासमोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2022 17:23 IST

Aai kuthe kay karte: अरुंधती एक यशस्वी वर्किंग वूमन होत आहे. तर, अनिरुद्ध अजूनही संकुचित विचारसरणीमध्ये अडकला आहे.

'आई कुठे काय करते' ही मालिका सध्या टीआरपीच्या शर्यतीत नंबर वनवर असल्याचं दिसून येतं. अनिरुद्ध आणि अरुंधती ही जोडी कायदेशीररित्या विभक्त झाल्यानंतर दोघांच्याही आयुष्यात अनेक घडामोडी घडत आहेत. अरुंधती एक यशस्वी वर्किंग वूमन होत आहे. तर, अनिरुद्ध अजूनही संकुचित विचारसरणीमध्ये अडकला आहे. यामध्येच अलिकडे अनिरुद्ध चोरपावलांनी अरुंधतीच्या घरी गेला होता. त्याचं हे सत्य आता देशमुख कुटुंबासमोर येणार आहे.

सध्या सोशल मीडियावर या मालिकेचा एक प्रोमो व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये अनिरुद्धचं सत्य देशमुख कुटुंबीयांना समजल्याचं दिसून येत आहे. अनिरुद्ध त्याच्या आईला हाक मारत असतानाच अविनाश त्याला वाटेत थांबवतो आणि काल रात्री अरुंधतीच्या घरी का गेला होतास?असा प्रश्न विचारतो. यावर अनिरुद्ध टोलवाटोलवी करतो. मात्र, सत्य परिस्थिती समोर आली आहे असं अविनाश त्याला सांगतो.

दरम्यान, अनिरुद्धचं सत्य देशमुख कुटुंबासह संजनासमोर आल्यानंतर तिची काय प्रतिक्रिया असेल? घरातल्यांनी विचारलेल्या प्रश्नांना अनिरुद्ध काय उत्तर देईल? असे अनेक प्रश्न प्रेक्षकांना पडले आहेत. मात्र, या प्रश्नांची उत्तरं मालिका पाहिल्यावरच प्रेक्षकांना मिळणार आहेत. 

टॅग्स :आई कुठे काय करते मालिकाटेलिव्हिजनटिव्ही कलाकारमिलिंद गवळी