Join us

गौरीमुळे देवकी-शालिनीत वादाची ठिणगी; एकमेकींच्या लगावणार कानशिलात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2022 18:40 IST

Sukh mhanje nakki kay asta: गौरी, देवकी आणि शालिनीमध्ये हळूहळू भांडणं लावण्यास सुरुवात करत आहे.

स्टार प्रवाहवरील 'सुख म्हणजे नक्की काय असतं' (Sukh Mhanje Nakki Kay Asata) ही मालिका सध्या रंजकदार वळणावर आहे. गौरी तिचं रूप बदलून आल्यामुळे घरातील प्रत्येकाला तिचा इंगा दाखवत आहे. यात शालिनी आणि देवकी यांची तर घरात चांगलीच फरफट होत. खोट्या जयदीपने गौरीला कड्यावरुन ढकलून दिल्यानंतर गौरी माईंच्या साथीने शालिनी, मानसी आणि जयदीपला धडा शिकवत आहे. यासाठी ती स्मरणशक्ती गेल्याचं नाटक करते. याच नाटकाचा एक भाग म्हणून आता ती शालिनी आणि देवकीला एक शिक्षा देणार आहे.

सध्या सोशल मीडियावर या मालिकेचा एक प्रोमो व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये गौरी, शालिनी आणि देवकीला शिक्षा देते. यात देवकी आणि शालिनी या दोघींनी एकमेकींच्या कानशिलात लगावायची आहे. तसंच या दोघींना ते जमलं नाही तर गौरी त्यांना मारणार असंही सांगते. त्यामुळे गौरीचा मार खाण्यापेक्षा एकमेकींचा मार खाल्लेला कधीही चांगला असं म्हणत त्या एकमेकींना मारायची शिक्षा देण्यास तयार होतात.

दरम्यान, सुरुवातीला एकमेकींना हळू मारणाऱ्या देवकी आणि शालिनी जाणूनबुजून जोरजोरात मारतात. त्यामुळे आता गौरी देवकी आणि शालिनीमध्ये हळूहळू भांडणं लावण्यास सुरुवात करत आहे. म्हणूनच, आता या मालिकेत पुढे गौरी घरातल्यांना नेमकं कशाप्रकारे वठणीवर आणणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

टॅग्स :टेलिव्हिजनटिव्ही कलाकारस्टार प्रवाह