Join us

इंद्रा-दिपूचं लग्न मोडण्यासाठी सानिका आखणार नवा डाव; मालिकेत पुन्हा मोठा ट्विस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2022 14:03 IST

Man udu udu zal: येत्या रविवारी या मालिकेचा १ तासाचा विशेष भाग रंगणार आहे. या भागात देशपांडे सर साळगावकरच्या घरी लग्नाची बोलणी करायला जाणार आहेत.

'मन उडू उडू झालं' ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. काही दिवसांपूर्वीच या मालिकेत एक मोठं वळण आलं होतं. दिपूचा अपघात झाल्यामुळे प्रेक्षक हवालदिल झाले होते मात्र, आता या संकटातून दिपू सुखरुपपणे बाहेर आली आहे. इतकंच नाही तर इंद्राचं दिपूवर असलेलं प्रेम देशपांडे सरांना कळलं आहे. त्यामुळे या दोघांचं लग्न लावून देण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला आहे. मात्र, आता हे लग्न होऊ नये यासाठी सानिका आणि कार्तिक प्रयत्न करणार आहेत.

येत्या रविवारी या मालिकेचा १ तासाचा विशेष भाग रंगणार आहे. या भागात देशपांडे सर साळगावकरच्या घरी लग्नाची बोलणी करायला जाणार आहेत. विशेष म्हणजे देशपांडे सरांनी लग्नासाठी घेतलेला पुढाकार पाहून जयश्रीला प्रचंड आनंद होतो. तर, दुसरीकडे सानिका नाराज होते.

दरम्यान, देशपांडे सरांनी आणलेलं स्थळ जयश्री ताई हसतहसत स्वीकारतात आणि दिपू-इंद्राच्या लग्नाच्या तयारीला लागतात. मात्र, हे लग्न होऊ नये यासाठी सानिका आणि कार्तिक प्रचंड प्रयत्न करत आहेत. इतकंच नाही तर दिपूच्या जीवावर बेतलेली सानिका आता हे लग्न मोडण्यासाठी नवीन प्लॅन आखत आहे. त्यामुळे आता सानिकाची नवी खेळी काय असेल? दिपू-इंद्राचं लग्न होणार का? देशपांडे सरांना इंद्राचं सत्य समजणार का? अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना या विशेष भागात मिळणार आहेत. 

टॅग्स :टेलिव्हिजनटिव्ही कलाकारऋता दूर्गुळे