महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांचा हीरक महोत्सवी सोहळा मंगळवार, ५ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी ६:३० वाजता वरळी येथील एनएससीआय डोम येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी ६० आणि ६१ वे महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान करण्यात आले. त्याचबरोबर नामांकित राज कपूर कपूर, व्ही शांताराम, जीवनगौरव आणि विशेष योगदान पुरस्कारही यावेळी प्रदान केले गेले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यावेळी उपस्थित होते. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज महावारसा पुरस्कार २०२५ ने विशाल शर्मांना सन्मानित करण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराज महावारसा पुरस्काराचे मानकरी विशाल शर्मांना रुपये तीन लाख, प्रमाणपत्र, मानचिन्ह आणि शाल असा सन्मान देण्यात आला. महाराष्ट्रातील किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून दिल्याबद्दल याशिवाय इतर इतर देशातील राजदूतांना महाराष्ट्रातील किल्ल्यांना मानांकन का मिळावं हे त्यांनी सांगितलं. त्यामुळेच महाराष्ट्रातील ११ किल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट करण्यात आले. महाराष्ट्रातील किल्ल्यांचं यामुळे जगाला महत्व कळालं.भारतीय पुरातत्व सर्व्हेक्षण विभागाने जागतिक वारसा यादीत महाराष्ट्रातील शिवनेरी, रायगडसह ११ किल्ले आणि तामिळनाडूमधील जिंजी अशा १२ किल्ल्यांचा समावेश करण्याची मागणी मान्य करण्यात आली आहे. भारतीय पुरातत्व सर्व्हेक्षण विभागाने याबाबतचा अहवाल तयार करून तो युनेस्कोच्या जागतिक वारसा केंद्राकडे पाठवला होता. यासाठी विशाल शर्मांनी जगासमोर महाराष्ट्रातील किल्ल्यांचं महत्व पटवून दिलं. त्यामुळेच महाराष्ट्रातील ११ किल्ले रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, खांदेरी तसेच तामिळनाडूतील एक जिंजी या किल्ल्यांचा समावेश आहे.