Join us  

चर्चा तर होणारच! मिसेस उपमुख्यमंत्री अमृता फडणवीसांचा हटके उखाणा ऐकलात का?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 07, 2024 11:08 AM

अमृता या सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असतात.

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी आणि गायिका अमृता फडणवीस नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. अमृता या सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असतात. या माध्यमातून त्या कायम चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात.   त्यांनी स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.  गाणी, अल्बम्स यासह रोखठोक भूमिकांसाठीदेखील अमृता फडणवीस ओळखल्या जातात. सध्या सोशल मीडियावर त्यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

नागपुरात भाजपच्या महिला आघाडीच्या वतीने दक्षिण-पश्चिम मंडळाकडून विकासाचे वाण हळदी कुंकू या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अमृता फडणवीस यांनी हटके उखाना घेतला. त्या म्हणाल्या, 'देवेंद्रजीनी मारले नाकर्तेपणावर बाण, आणि मी घेऊन आली विकासाचे वाण.. आपण सर्वांनी स्वीकारावे आणि एकत्र महाराष्ट्र करू निर्माण'. तसेच महिलांनी आग्रह केल्यानंतर अमृता फडणवीसांनी गाणंही गायलं. त्यांच्या या उखाण्याची आणि गाण्याची सर्वत्र चर्चा दिसून येत आहे. 

अमृता फडणवीस या राजकारणात थेट सक्रिय नसल्या तरी त्या कायम पती देवेंद्र फडणवीस यांची खंबीरपणे साथ देताना दिसून येतात. कधी टोलेबाजी करत विरोधकांवर निशाणा साधतात. आताही त्यांनी आपल्या उखाण्यामधून अनोख्या पद्धतीने विरोधकांना टोला लगावला आहे. ज्याचा व्हिडीओ हा सध्या बराच व्हायरल होत आहे. 

अमृता फडणवीस या बँकर आहेत. मात्र त्यांना गायनाची प्रचंड आवड आहे. याआधीही त्यांचे म्युझिक व्हिडीओ प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. अमृता फडणवीस यांनी यापूर्वी देखील अनेक भक्तीपर गीते गायली आहेत. नुकतेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लिहलेलं आणि अमृता फडणवीसांनी गायलेलं 'राम भजन'  प्रदर्शित करण्यात आलं आहे. या गाण्याला सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध संगीतकार अजय-अतुल यांनी संगीत दिलं आहे. 

टॅग्स :अमृता फडणवीससेलिब्रिटीदेवेंद्र फडणवीसनागपूरभाजपा