Join us
Daily Top 2Weekly Top 5

रात्रीचे ३ वाजलेले, पाईपवर चढून आला चोर; बेडरुममध्येही शिरला अन्...मराठी दिग्दर्शिकेच्या घरी चोरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2024 16:53 IST

या भयानक घटनेचं सीसीटीव्ही फुटेज बघा

मराठी दिग्दर्शिका स्वप्ना वाघमारे जोशी (Swapna Joshi) यांच्या अंधेरी येथील घरी काल चोरीची घटना घडली. स्वप्ना जोशी आपल्या वृद्ध आईसोबत अंधेरी पश्चिम येथील एका फ्लॅटमध्ये सहाव्या मजल्यावर राहतात. रात्री ३ च्या सुमारास एक चोर चक्क पाईप चढून खिडकीतून त्यांच्या घरात आला. पूर्ण घरात तो फिरला. यात त्याला काही हजारांची कॅश मिळाली. हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. स्वप्ना जोशी यांचे मित्र आणि फिल्म निर्माते अशोक पंडित यांनी व्हिडिओ शेअर करत या घटनेची माहिती दिली.

स्वप्ना जोशी अंधेरी पश्चिम येथे 3 बीएचके फ्लॅटमध्ये राहतात. त्यांच्यासोबत त्यांची आई, मुलगी आणि जावई देखील असतात. एक चोर दबक्या पावलाने खिडकीतून आत येतो. हॉलमधल्या गोष्टी बघतो. नंतर बेडरुममध्ये जातो. त्याला पर्समधून 6 हजार मिळतात ते तो काढतो. नंतर मांजरीने आवाज केल्याने त्यांचा जावई जागा होतो. तो चोराच्या मागे पळणार तेवढ्यात चोर खिडकीतून उडी मारुन पसार होतो. हा सर्व भयानक प्रकारात कॅमेऱ्यात दिसत आहे. 

या प्रकारानंतर स्वप्ना जोशी यांनी पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. नशीब चोराने हल्ला केला नाही असं त्या म्हणाल्या. तसंच निर्माते अशोक पंडित यांनी बिल्डिंगमधील सुरक्षा अधिकाऱ्यांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. ते असताना अशा प्रकारे पाईपवरुन चढून चोर येऊ शकतो तर लोक घरातही सुरक्षित नाही असं मत त्यांनी मांडलं.

टॅग्स :चोरीमुंबईसेलिब्रिटीबॉलिवूड