लोकप्रिय युट्यूबर आणि गायिका असलेली स्वानंदी सरदेसाई लग्नाच्या बेडीत अडकली आहे. स्वानंदीने रविवारी(१९ एप्रिल) अक्षय्य तृतीयेच्या मुहुर्तावर लग्नगाठ बांधत तिच्या नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. सोशल मीडियावरुन लग्नाचा फोटो पोस्ट करत स्वानंदीने ही आनंदाची बातमी तिच्या चाहत्यांना दिली आहे. लग्न झाल्याची बातमी देत स्वानंदीने तिच्या चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे.
स्वानंदीने विक्रांत रामदास याच्यासोबत सप्तपदी घेत वैवाहिक जीवनाला सुरुवात केली आहे. इन्स्टाग्रामवरुन गायिकेने पतीसोबतचा फोटो शेअर केला आहे. "श्री. व सौ. अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर : १९-०४-२०२६", असं कॅप्शन तिने या फोटोला दिलं आहे. सेलिब्रिटी आणि चाहत्यांनी स्वानंदीचं कमेंटमध्ये अभिनंदन करत तिला वैवाहिक जीवनासाठी आणि सुखी संसारासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. आयुष्यातील या खास क्षणासाठी स्वानंदी आणि तिचा पती रामदास यांनी पारंपरिक लूक केला होता. स्वानंदीने हिरव्या रंगाची नऊवारी साडी नेसून साजशृंगार केला होता.
स्वानंदी एक गायिका असण्यासोबतच लोकप्रिय युट्यूबरदेखील आहे. कोकणातील व्हिडीओ ती शेअर करत असते. याशिवाय सुमधूर आवाजातील गाणीही स्वानंदी चाहत्यांसोबत शेअर करते. 'दशावतार' या मराठी सिनेमातही स्वानंदीला एक गाणं गाण्याची संधी मिळाली होती. स्वानंदीचा पतीही मराठी सिनेइंडस्ट्रीत कार्यरत आहे.
Web Summary : YouTuber and singer Swanandi Sardesai tied the knot with Vikrant Ramdas on Akshaya Tritiya. She shared the news with a photo on Instagram. The couple wore traditional attire. Swanandi also sang in the Marathi movie 'Dashavatar'. Her husband also works in the Marathi film industry.
Web Summary : यूट्यूबर और गायिका स्वानंदी सरदेसाई ने अक्षय तृतीया पर विक्रांत रामदास के साथ शादी कर ली। उन्होंने इंस्टाग्राम पर एक तस्वीर के साथ यह खबर साझा की। जोड़े ने पारंपरिक परिधान पहने थे। स्वानंदी ने मराठी फिल्म 'दशावतार' में भी गाना गाया है। उनके पति भी मराठी फिल्म उद्योग में काम करते हैं।