रिंकू राजगुरू (Rinku Rajguru) मराठी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने 'सैराट' (Sairat Movie) सिनेमातून तिच्या कारकीर्दीची सुरुवात केली. त्यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिले नाही. बऱ्याच सिनेमात रिंकूने काम केले. ती सिनेमांशिवाय तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत येत असते. बऱ्याचदा तिचं नाव सैराटमधील तिचा सहकलाकार परशा उर्फ आकाश ठोसर(Akash Thosar)सोबत जोडलं जातं. तिला एका मुलाखतीत रिंकूने आकाशसोबतच्या रिलेशनशीपच्या चर्चेवर आपलं मौन सोडलं.
सैराट चित्रपट रिलीज होऊन बरीच वर्षे उलटली आहेत. मात्र अद्याप प्रेक्षकांमधील आर्ची आणि परश्याची क्रेझ संपलेली नाही. सिनेमानंतरही आकाश आणि रिंकूमध्ये खूप चांगली मैत्री आहे. ते बऱ्याचदा भेटल्यावर एकमेकांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. ते फोटो पाहून अनेकदा त्यांच्या नात्याची चर्चा होते. त्यांच्या चाहत्यांना ते दोघे रिलेशनशीपमध्ये असल्याचे वाटते. नुकतेच सकाळ प्रीमियरला दिलेल्या मुलाखतीत रिंकूने आकाशसोबतच्या रिलेशनशीपच्या चर्चेवर मौन सोडले आहे.
''तेव्हापासून आमच्यामध्ये मैत्री आहे...''
रिंकूला मुलाखतीत आकाश ठोसरसोबतच्या बॉण्डिंगबद्दल विचारण्यात आले. त्यावर रिंकूने सांगितले की,''आमची मैत्री खूपच चांगली आहे. म्हणजे तेव्हापासून आमच्यामध्ये मैत्री आहे. आम्हाला काहीही वाटलं तरी आम्ही फोनवर बोलतो. जसे की मी त्याला फोन करुन म्हणाले की, मला बोअर होते आहे. तू मुंबईला येशील का? मग अमुक शो बघायला जाऊ किंवा मी पुण्याला गेले की एखाद्या कॅफेमध्ये बसून अमुक हा चित्रपट पाहिला का? मला अमुक या व्यक्तीचं काम खूप आवडलं. तसेच आम्ही एकमेकांना विविध मुलाखतीदेखील सुचवत असतो. आम्ही सतत बोलत असतो. त्यामुळे आमच्यात खूप चांगली मैत्री आहे. मित्र म्हणून आमच्यात पारदर्शकता आहे.''