आज गुढीपाडवा. हिंदू नवीन वर्षाचा आनंद सर्वजण उत्साहात साजरा करत आहेत. याच शुभमुहुर्तावर मराठी कलाकारांच्या आयुष्यात आनंदाचा क्षण साजरा झाला आहे. मराठी अभिनेतासिद्धार्थ चांदेकर-मिताली मयेकर यांच्या आयुष्यात गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर आनंदाचा क्षण साजरा झाला आहे. सिद्धार्थ-मितालीने गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर नवीन घरात प्रवेश केला आहे. दोघांनी नवीन घरातला खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.सिद्धार्थ-मितालीने केला नवीन घरात प्रवेशसिद्धार्थ चांदेकर-मिताली मयेकर यांनी नवीन घरात केलेला गृहप्रवेशाचा व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड केलाय. या व्हिडीओत कलशावर मिताली स्वस्तिक काढताना दिसते. पुढे सिद्धार्थ गुढीवर साखरेच्या गाठीची माळ बांधताना दिसतो. पुढे दोघे मिळून गुढीवर कलश ठेवतात. त्यानंतर निरंजन पेटवून दोघेही गुढीची पूजा करतात. त्यानंतर सिद्धार्थ-मिताली अत्यंत आनंदात गुढीची पूजा करतात. गुढी उभारल्यानंतर दोघेही नव्या घराकडे पाहतात. एकूणच नवीन वर्षात नवं घर घेतल्याचा स्वप्रपूर्तीचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर झळकलेला दिसतोय.
Web Summary : Siddharth Chandekar and Mitali Mayekar celebrated Gudi Padwa by entering their new home. The couple shared a video of the housewarming ceremony on social media, expressing their joy. Fans showered them with congratulations.
Web Summary : सिद्धार्थ चांदेकर और मिताली मयेकर ने अपने नए घर में प्रवेश करके गुड़ी पड़वा मनाया। जोड़े ने सोशल मीडिया पर गृहप्रवेश समारोह का एक वीडियो साझा किया, जिसमें उन्होंने अपनी खुशी व्यक्त की। प्रशंसकों ने उन्हें बधाई दी।