Join us

'पिवळ्या रंगाचे कपडे घालणं बंद...', ऋतुराजसोबतच्या चर्चांवर सायली संजीव स्पष्टच बोलली

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2023 08:53 IST

मी पिवळ्या रंगाच्या ड्रेसमधील एक फोटो शेअर केला अन्...

मराठी अभिनेत्री सायली संजीव (Sayali Sanjeev) आणि भारतीय क्रिकेटपटू ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) यांच्यातील अफेअरच्या चर्चा थांबण्याचं नावच घेत नाहीएत. सायलीने कोणाताही फोटो पोस्ट केला की त्याखाली ऋतुराजचं नाव येतंच. नुकताच तिने पिवळ्या रंगाच्या ड्रेसमधील फोटो पोस्ट केला. यावरुन लगेच ऋतुराज सीएसकेकडून खेळत असल्याने आणि त्यांच्या जर्सीचा रंग पिवळा असल्याने तिच्या फोटोवर कमेंट आल्या. आता मात्र या सगळ्याला सायली वैतागली आहे. 

मुंबई तक बैठकीत सायली संजीवला ऋतुराजसोबतच्या नात्यावर प्रश्न विचारलाच. या प्रश्नावर आता तिने थेट उत्तर दिलं आहे. सायली म्हणाली,' मी पुन्हा एकदा सांगते आम्ही खूप चांगले मित्र आहोत. पण या सततच्या ट्रोलिंगमुळे आमच्यातली मैत्रीही संपली आहे. या ट्रोलिंगचा खरंच खूप त्रास होतोय. मी पिवळ्या रंगाच्या ड्रेसमधील एक फोटो शेअर केला. तो माझ्या सिनेमाच्या प्रमोशनचा एक भाग होता. पण त्याखाली आलेल्या कमेंट बघून मला भीतीच वाटली. मी आता पिवळे कपडे घालणंच बंद केलं पाहिजे का? पिवळा रंग रंग आहे तो आधीही घालत होतेच की..'

सायली पुढे म्हणाली,'उद्या जेव्हा त्याचं दुसऱ्या कोणाशी लग्न होईल किंवा माझं कोणाशी लग्न होईल तेव्हाच या सगळ्या चर्चा बंद होतील असंत दिसतंय.'

सायली संजीव आणि ऋतुराज गायकवाड हे एकाच कॉलेजमध्ये होते.काही वर्षांपूर्वी सायलीच्या एका फोटोवर ऋतुराजने कमेंट केली होती. यावर सायलीने हार्ट इमोजीचा रिप्लाय दिला होता. यानंतर त्यांच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आलं. सायलीचा नुकताच 'गोष्ट एका पैठणीची' हा सिनेमा रिलीज झाला. या सिनेमात तिच्या अभिनयाचं कौतुकही करण्यात आलं.

टॅग्स :सायली संजीवऋतुराज गायकवाडमराठी अभिनेतारिलेशनशिप