Join us

'वास्तव'मध्ये कशी मिळाली 'देढ फुटिया'ची भूमिका? संजय नार्वेकरांनी शेअर केल्या खास आठवणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2025 15:10 IST

'वास्तव' सिनेमात 'देढ फुटिया' ही भूमिका कशी मिळाली? संजय नार्वेकरांनी पहिल्यांदाच केला खुलासा, म्हणाले...

Sanjay Narvekar: महेश मांजरेकर दिग्दर्शित 'वास्तव' हा बॉलिवूडमधील कल्ट सिनेमांपैकी एक आहे. या चित्रपटाची आजही चाहत्यांमध्ये भलतीच क्रेझ आहे.१९९९ साली आलेल्या या चित्रपटात संजय दत्तची प्रमुख भूमिका होती. गॅंगस्टरवर आधारित वास्तव , द रिअॅलिटीमध्ये संजय दत्तने रघू नावाची भूमिका साकारली होती. तर मराठमोळे अभिनेते संजय नार्वेकरांनी देटफुट्याचं पात्र उत्तमरित्या वठवलं. सहकलाकाराची भूमिका असूनही संजय नार्वेकरांनी प्रेक्षकांच्या मनावर छाप उमटवली. विशेष म्हणजे या सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये त्यांचं नाव झालं.मात्र,ही भूमिका करण्याची संधी त्यांना कशी मिळाली याबद्दल त्यांनी एका मुलाखतीत किस्सा शेअर केला आहे.

सौमित्र पोटे यांच्या 'मित्र म्हणे' या पॉडकास्टमध्ये अभिनेते संजय नार्वेकर यांनी वास्तव चित्रपटाच्या शूटिंच्या आठवणी सांगितल्या. नाटकातील त्याचं काम पाहून महेश मांजरेकरांनी निर्मात्यांना त्याचं नाव सूचवलं होतं, असंही ते म्हणाले. शिवाय सुरुवातीला देडफूट्याच्या भूमिकेसाठी एका प्रसिद्ध अभिनेत्याची निवड करण्यात आली होती,असा खुलासाही त्यांनी मुलाखतीत केला. या मुलाखतीमध्ये ते म्हणाले, त्यावेळी मी रुईया कॉलेजच्या एकांकिका दिग्दर्शित करायचो.तेव्हा नाक्यावर आम्ही भेटायचो.एक दिवस महेश तिथे आला आणि म्हणाला,'संज्या तुझी संधी गेली रे, मी तुझं नाव सांगितलं होतं.पण नाही झालं.मला ती भूमिका केवढी मोठी आहे तेही माहीत नव्हतं.म्हटलं ठीक आहे, जे नशिबात आहे तेच होईल. त्याचदरम्यान,एके दिवशी नाक्यावरच्या डीपी नावाच्या हॉटेलमध्ये महेश मांजरेकरांचा फोन आला. त्याचक्षणी त्याने मला मढ आयलंडला बोलावलं. मग मी मित्रासोबत तिथे पोहोचलो, असं त्यांना सांगितलं."

यापुढे सेटवर गेल्यानंतर काय घडलं याविषयी सांगताना ते म्हणाले की, "मी तिथे पोहोचलो.तेव्हा शूटिंग करण्यापूर्वी कॅमेरापासून सगळ्या गोष्टी चेक करायचे.या भूमिकेसाठी ज्या मोठ्या नटाला निवडलं होतं, त्याच्याकडे तारखा नव्हत्या. महेशही तेव्हा नवीन असल्याने त्याने मणिरत्ममला निवडलं. तेव्हा संजय दत्त महेशला म्हणाला की, तू ज्या मराठी अभिनेत्याचं नाव सांगितलं होतं, त्याला बोलाव ना... बघू तरी काय करतो. म्हणून मला बोलावलं होतं. हिरोच बोलतोय त्यामुळे निर्मात्याला काही बोलता आलं नाही. मग ते शूट केलं, डेव्हलप केलं आणि त्यानंतर पाहिलं. एक दिवस गेला आणि दुसऱ्या दिवशी मला निरोप आला की, मढ आयलंडला जिथे शूटिंग झालं तिथे ये,९ची शिफ्ट आहे. " असा खुलासा त्यांनी केला. 

दरम्यान, १९९९ साली प्रदर्शित झालेल्या या सिनेमात संजय दत्त आणि नम्रता शिरोडकर ही जोडी मुख्य भूमिकेत होती. तर, रीमा लागू, शिवाजी साटम, मोहनीश बहल ही कलाकार मंडळीदेखील महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकली होती.

टॅग्स :संजय नार्वेकरसंजय दत्तबॉलिवूडसिनेमा