'सैराट' (Sairat Movie) चित्रपटातून तानाजी गळगुंडे (Tanaji Galgunde)ने मराठी कलाविश्वात पदार्पण केलं. या चित्रपटात त्याने लंगड्याची भूमिका साकारली होती. या सिनेमानंतर तो बऱ्याच चित्रपटात झळकला. तो प्रोफेशनल लाइफव्यतिरिक्त खासगी आयुष्यामुळे चर्चेत येतो. काही महिन्यांपूर्वी त्याने त्याच्या गर्लफ्रेंडबाबत खुलासा केला. तो तिच्यासोबत लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहत होता. मात्र आता तो लवकरच बाबा होणार आहे. त्याची गर्लफ्रेंड प्रेग्नेंट आहे. तिच्या बेबी शॉवरचे फोटो समोर आले आहेत. त्या दोघांनी लग्न केले का, हे अद्याप समजू शकलेलं नाही.
तानाजी गळगुंडे प्रतीक्षा शेट्टी (Prathiksha Shetty) सोबत गेल्या ५-६ वर्षांपासून रिलेशनशीपमध्ये आहे आणि तो तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहत होता. मात्र आता तिच्या बेबी शॉवरचे फोटो समोर आले आहेत. या फोटोत तानाजी दिसत नाही आहे. पण सैराटमधील सल्या म्हणजेच अरबाजची गर्लफ्रेंड पाहायला मिळत आहे. या फोटोत तिच्या गळ्यात मंगळसूत्रही पाहायला मिळत आहे. त्यामुळे त्या दोघांनी लग्न केले का, हे अद्याप समजू शकलेलं नाही. पण तानाजी लवकर बाबा होणार आहे हे नक्की.
सुरूवातीला आईचा अभिनेत्याच्या नात्याला होता विरोध
तानाजी गळगुंडेची गर्लफ्रेंड प्रतीक्षा शेट्टी एक मॉडेल आणि उद्योजिका आहे. त्याच्या ऑपरेशनच्या काळात तिने त्याची विशेष काळजी घेतली होती. प्रतीक्षा वेगळ्या जातीमधली असल्यामुळे सुरुवातीला तानाजीच्या आईने त्यांच्या नात्याला विरोध केला होता. मात्र, कालांतराने तानाजीने आपल्या आईला समजावून सांगितल्यानंतर त्यांनी त्यांचे नाते स्वीकारले होते. त्याने एका मुलाखतीत याबद्दल सांगितले होते की, ''माझी जी गर्लफ्रेंड आहे ती दुसऱ्या जातीतली आहे. आम्ही गेली ५-६ वर्षे एकमेकांसोबत आहोत. आम्ही अनेकदा एकत्र भेटतो, बोलतो. माझ्या ऑपरेशनच्या काळात तिनेच माझी खूप काळजी घेतली होती. पण आईला जेव्हा हे कळलं की आम्ही दोघ लिव्ह इनमध्ये राहतो तेव्हा तिने माझ्यासोबत भांडण केलं. तिला ते अजिबात मान्य नव्हतं. ती मुलगी दुसऱ्या कास्टची आहे हे आईला माहीत होतं कारण त्या मुलीची आई आमच्या गावातली आहे. त्या मुलीसोबत एकत्र राहायचं. तिच्याशी लग्न करायचं नाही असं माझी आई मला म्हणाली. तू दुसरी कोणीही कर अगदी दुसऱ्या कुठल्याही जातीची कर पण तिला करू नको, कारण ती मुलगी आपल्या गावातल्या लोकांना माहितीतली आहे असं तिचं म्हणणं होतं. ती वेगळ्या जातीची आहे हे गावातल्या लोकांना समजू नये, म्हणून ती असं म्हणत होती. मला तिचं ते म्हणणं पटत नव्हतं.''
तानाजीच्या आईनेही नंतर त्यांचं हे नातं स्वीकारलं होतं. त्यामुळे चाहते त्यांच्या लग्नाबद्दल जाणून घेण्यासाठी उत्सुक होते. मात्र आता बेबी शॉवरचे फोटो पाहिल्यानंतर त्यांनी लग्न केले का की ते अद्याप लिव्ह इनमध्ये राहतात का, असे प्रश्न अनेकांना पडले आहेत. आता यावर अभिनेता काय प्रतिक्रिया देतो, हे पाहणे कमालीचे ठरणार आहे.