Join us

अपहरणाचा सीन, फिल्म प्रोजेक्ट..., रोहित आर्याने मराठी अभिनेत्रीला केलेला मेसेज; स्क्रीनशॉट दाखवत म्हणाली....

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2025 14:09 IST

अभिनेत्रीने रोहित आर्याला पवईच्या आरए स्टुडिओमध्ये जाऊन भेटणारही होती, पण...

मुंबईला हादरवणारी घटना काल ३० ऑक्टोबर रोजी घडली. पवईतील आरए स्टुडिओमध्ये रोहित आर्या  या व्यक्तीने काही लहान मुलांना ओलीस ठेवलं. व्हिडीओ शेअर करत त्याने आपली मागणीही सांगितली. पोलिसांनी समयसूचकता दाखवत रोहितला ताब्यात घेतलं. मात्र त्यांच्यात चकमक झाली आणि रोहित आर्याचा मृत्यू झाला. यानंतर रोहित आर्यासंबंधी अनेक माहिती एकानंतर एक समोर येत आहे. त्यातच आता एका मराठी अभिनेत्रीने धक्कादायक खुलासा केला आहे. रोहित आर्यने तिच्याशी महिनाभरापूर्वीच संपर्क साधल्याचं ती म्हणाली आहे. तसंच तिने व्हॉट्सअॅप स्क्रीनशॉटही शेअर केले आहेत.

ही अभिनेत्री आहे रुचिता जाधव. रुचिताने सोशल मीडियावर 'लोकमत मुंबई'चा व्हिडीओ शेअर केला आहे. पुढे तिने व्हॉट्सअॅप स्क्रीनशॉट शेअर केले आहेत. यात रोहित आर्याने तिला ४ ऑक्टोबर रोजीच मेसेज केल्याचं दिसत आहे. नवीन सिनेमासंबंधी चर्चा करायची असल्याचं तो बोलतोय. नंतर दोघांमध्ये २८ ऑक्टोबर रोजी भेटायचंही ठरतं. रोहित आर्या तिला 'आरए स्टुडिओ' हे भेटायचं लोकेशन सांगतो.

पुढे रुचिता लिहिते, "मला सगळ्यांसोबत काहीतरी वैयक्तिक शेअर करायचं आहे ज्यामुळे मी खूप हादरले आहे. ४ ऑक्टोबर रोजी मला रोहित आर्या या व्यक्तीने फिल्म प्रोजेक्टसाठी संपर्क साधला. सिनेमा कशासंबंधी आहे? तर काही मुलांना ओलीस ठेवण्याचा सीन असल्याचं त्याने सांगितलं. सीन ऐकून मीही आणखी ऐकण्यासाठी तयार झाले. २३ ऑक्टोबर रोजी त्याने मला कधी भेटायचं विचारलं. २७ ऑक्टोबर रोजी त्याने मला पवईच्या आरए स्टुडिओचं लोकेशन पाठवलं. माझ्या घरी इमर्जन्सी असल्याने मी जाऊ शकले नाही. आज मी जेव्हा बातमी पाहिली तेव्हा मला धक्का बसला. मी या घटनेच्या किती जवळ असणार होते हा विचार करुन मला स्वस्थ बसवत नाहीये. यातून एकच कळतं की कामासाठी आपण कोणाला भेटतो हे आधी नीट बघितलं पाहिजे. सुरक्षित राहा, तुमच्या instinct वर विश्वास ठेवा आणि जिथे जात असाल तिथल्या तुमच्या लोकेशनची माहिती आधीच कुटंबातील सदस्याला किंवा मित्रपरिवाराला देऊन ठेवा."

रुचिताच्या या खुलाश्यानंतर सर्वांना धक्काच बसला आहे. आर ए स्टुडिओमध्ये रोहित आर्याचा तिलाही बोलवण्याचा डाव होता. तो सिनेमा करतोय असं म्हणत त्याने काही मराठी सेलिब्रिटींशी संपर्कही साधला होता. इतकंच नाही तर गिरीश ओक, ऊर्मिला कोठारे या काही मराठी कलाकारांनी नुकतीच या स्टुडिओमध्ये जाऊन मुलांची भेट घेतली होती असे फोटो सोशल मीडियावर समोर आले आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Marathi actress reveals chilling message from deceased kidnapper, Rohit Arya.

Web Summary : Actress Ruchita Jadhav shares WhatsApp screenshots revealing Rohit Arya contacted her for a film involving a hostage scene before the studio incident. She narrowly avoided meeting him, highlighting the importance of safety precautions.
टॅग्स :मराठी अभिनेतामुंबईअपहरणमुंबई पोलीसइन्स्टाग्रामसोशल मीडिया