Join us
Daily Top 2Weekly Top 5

'सैराट'च्या मानधनाचं रिंकूने काय केलं?; मिळालेल्या पैशातून खरेदी केली होती 'ही' गोष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2023 14:17 IST

Rinku rajguru: 'सैराट'च्या मानधनातून रिंकूने अशी गोष्ट खरेदी केली. जे पाहून नेटकऱ्यांनी तिचं कौतुक केलं आहे.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे रिंकू राजगुरु (rinku rajguru). उत्तम अभिनयशैलीमुळे रिंकूने फार कमी वयात लोकप्रियता मिळवली. त्यामुळे सोशल मीडियावर तिच्या नावाची कायम चर्चा रंगत असते. सैराट या सिनेमातून कलाविश्वात पदार्पण करणाऱ्या रिंकूने मेकअप, आठवा रंग प्रेमाचा, कागर असे बरेच सिनेमा केला. अलिकडेच तिचा झिम्मा 2 हा सिनेमा रिलीज झाला. परंतु, तिच्या सैराटची लोकप्रियता अजूनही कमी झालेली नाही. या सिनेमाविषयी नेटकऱ्यांमध्ये कायम चर्चा रंगत असते.

अलिकडेच रिंकूने 'लोकमत फिल्मी'च्या 'माय फर्स्ट' या सेगमेंटमध्ये या सिनेमाविषयी काही गोष्टी शेअर केल्या. यात सैराटमधून मिळालेल्या पहिल्या मानधनाचं तिने काय केलं हे सुद्धा तिने यावेळी सांगितलं. विशेष म्हणजे रिंकून तिच्या पहिल्या पगारात अशी गोष्ट खरेदी केली जे पाहून नेटकऱ्यांनी तिचं कौतुक केलं.

"तू तुझ्या पहिल्या स्व कमाईतून घेतलेली पहिली वस्तू कोणती? असा प्रश्न रिंकूला विचारण्यात आला. त्यावर, तिने दिलेल्या उत्तरामुळे तिने पुन्हा एकदा चाहत्यांची मनं जिंकून घेतली. सैराटमधून मला जे पैसे, म्हणजे जो पगार मिळाला होता. त्यातून मी १० वीची पुस्तक खरेदी केली होती", असं उत्तर रिंकूने दिलं.

दरम्यान, रिंकूला कुटुंबाकडून शैक्षणिक वारसा मिळालेला आहे. रिंकूचे वडील महादेव राजगुरु हे स्वत: एक शिक्षक आहेत. त्यामुळे तिच्यावर देखील त्याच पद्धतीचे संस्कार झाले आहेत. म्हणूनच सैराटमधून मिळालेल्या पहिल्या पगारात तिने शाळेची पुस्तक खरेदी केली. रिंकूने कुठेही वायफळ खर्च न करता ते पैसे सत्कारणी लावले हे ऐकून नेटकऱ्यांनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. नुकताच रिंकूचा 'झिम्मा 2' हा सिनेमा रिलीज झाला. या सिनेमात तिने तानिया ही भूमिका साकारली आहे. विशेष म्हणजे या मल्टीस्टारर सिनेमातही रिंकूने तिचं वेगळंपण जपलं आहे.

टॅग्स :रिंकू राजगुरूसिनेमासेलिब्रिटीसैराट 2