'सैराट' (Sairat) फेम अभिनेत्री रिंकू राजगुरू (Rinku Rajguru) ही मराठी चित्रपटसृष्टीतली ग्लॅमरस आणि लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. रिंकूची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढताना दिसते आहे. खऱ्या आयुष्यात चाहत्यांच्या मनावर राज्य करत आहे. रिंकू राजगुरु आपल्या सहज अभिनयासोबतच सोशल मीडियावरही तितकीच प्रभावी आहे. रिंकू सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह असून, तिच्या प्रत्येक पोस्टवर चाहत्यांचं लक्ष असतं. अलीकडेच तिने इंस्टाग्रामवर टाकलेलं एक स्टेटस चर्चेचा विषय ठरत आहे.
नुकतेच रिंकूच्या इंस्टाग्रामवरील चाहत्यांच्या यादीत लक्षणीय वाढ झालीये. १ मिलियन म्हणजे १० लाख चाहते सध्या रिंकूला इंस्टाग्रामवर फॉलो करत आहेत. रिंकूने इंस्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट करत १ मिलियन फॉलोअर्स पूर्ण झाल्याचा आनंद व्यक्त केला. इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करत रिंकूने "Thankful, Grateful, Blessed" असं लिहीत आपल्या चाहत्यांचे आभार मानले.
रिंकू ही मराठी प्रेक्षकांची आवडती आहे. 'सैराट' या चित्रपटानंतर रिंकू राजगुरूने आपल्या लूक्सवर आणि फिटनेसवर खूप मेहनत घेतली. आतापर्यंत तिनं अनेक भूमिका निभावल्या. मिळालेल्या प्रत्येक संधीचं रिंकूने सोनं केलंय. कागर, मेकअप, झुंड आणि अनपॉज्ड सारख्या चित्रपटांत ती झळकली. हँड्रेड डेज या वेबसीरिजमध्येही तिने काम केलं. रिंकू राजगुरू सध्या फक्त २४ वर्षांची आहे. ३ जून २००१ रोजी जन्मलेली रिंकू ही महाराष्ट्रातील अकलूज येथील आहे. तिचे आई-वडील उषा आणि महादेव दोघेही हाडाचे शिक्षक आहेत. रिंकूच्या आई-वडिलांना नृत्य आणि गायनात रस आहे. त्यामुळे रिंकूलादेखील लहानपणापासून कलेची आवड निर्माण झाली. आई-वडिलांच्या पाठिंब्यामुळेच रिंकूने स्वत:ला सिद्ध केलं आहे.