Join us
Daily Top 2Weekly Top 5

गुलाबाची कळी....! रिंकू राजगुरू गुलाबी रंगाच्या साडीत दिसतेय झक्कास

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2020 10:36 IST

रिंकू राजगुरूचा गुलाबी रंगाच्या साडीतील फोटो पाहून म्हणाल क्या बात है!

अभिनेत्री रिंकू राजगुरु सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असते. आपले फोटो आणि व्हिडीओ ती त्यांच्यासोबत शेअर करत असते. तिचे विविध अंदाजातील आणि तिच्या चित्रपटाच्या संबंधीत असलेले फोटो ती यावर पोस्ट करत असते. तिच्या सगळ्याच फोटोंना तिच्या फॅन्सचा भरभरून प्रतिसाद मिळतो.

काही दिवसांपूर्वी रिंकू राजगुरूने गुलाबी रंगाच्या साडीतील फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. खरंतर तिने हा फोटो 8 मार्च रोजी महिला दिनानिमित्त शेअर केला होता. या फोटोत तिने गुलाबी रंगाची साडी त्यावर केसात माळलेला गजरा आणि तिचे ते स्मित हास्य सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. तिच्या या फोटोला खूप लाइक्स मिळत आहे.

सैराटच्या यशानंतर रिंकूने कधीच मागे वळून पाहिले नाही. या चित्रपटात आर्ची साकारणारी रिंकू राजगुरू भलतीच भाव खाऊन गेली. तिचा प्रत्येक ठसकेबाज संवाद, तिचा बुलेट अंदाज, परशावरील प्रेम असा प्रत्येक अंदाज रसिकांना भावला.

त्यामुळेच सैराटमधील आर्ची अवघ्या महाराष्ट्राची लाडकी बनली. त्यानंतर ती कागर सिनेमात झळकली. त्यानंतर ती मेकअप या मराठी चित्रपटातही दिसली. यात तिच्यासोबत चिन्मय उद्गीरगकर दिसला होता.

या सिनेमासाठी रिंकूने घेतलेले मानधन हे सर्वाधिक होते अशी चर्चा ऐकाला मिळाली होती.

सध्या रिंकू ही मराठी सिनेसृष्टीतील टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे.

टॅग्स :रिंकू राजगुरूसैराट 2कागरमेकअपचिन्मय उद्गगिरकर