Join us
Daily Top 2Weekly Top 5

कुछ तो रापचीक हो रहेला है भीडू..., रवी जाधवांची पोस्ट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2021 17:50 IST

मराठी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध दिग्दर्शक Ravi Jadhav यांच्या चित्रपटांचे फॅन असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.

मराठी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध दिग्दर्शक व अभिनेते रवी जाधव यांच्या चित्रपटांचे फॅन असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. होय, कुछ तो रापचीक हो रहेला है भीडू... यावरून फार काही बोध झाला नसेल तर रवी जाधवांची ताजी पोस्ट तुम्ही वाचायलाच हवी.नटरंग आणि टाईमपास सारखे दर्जेदार सिनेमे देणाºया रवी जाधवांनी इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे आणि सध्या या पोस्टचीच चर्चा आहे आणि चर्चा का नसावी? आपला भीडू अर्थात जॅकी श्रॉफ यांच्याशी संबंधित पोस्ट म्हटल्यावर चर्चा तर होणारच.

रवी यांनी जॅकीसोबतचा एक फोटो शेअर केला आहे, सोबत एक रापचीक बातमी. पोस्टमध्ये रवी जाधव लिहितात,‘हिरो, राम लखन, परींदा, कर्मा, त्रिदेव... भाड्याने व्हिसीआर आणि कलर टीव्ही आणून अनेक वेळा पाहिले... तेव्हा माहित नव्हते, एक दिवस या रियल हिरोसोबत काम करायला मिळेल. कुछ तो रापचीक हो रहेला है भीडू....’

या पोस्टमध्ये बाकी तपशील दिलेला नाही. पण संकेत मात्र दिले आहेत. होय, रवी जाधवांच्या आगामी सिनेमात कदाचित भीडू दिसणार आहे.  अलीकडे जॅकी ‘सूर्यवंशी’च्या प्रमोशनसाठी ‘चला हवा येऊ द्या’या शोमध्ये आले होतं. तेव्हा त्यांनी मराठी चित्रपटांमध्ये काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यांची ही इच्छा लगेच पूर्ण झाली, असं म्हणायला हरकत नाही. याआधी जॅकी यांनी हृदयनाथ या मराठी चित्रपटामध्ये काम केलं आहे.

तीन राष्ट्रीय पुरस्कार मिळवणारे रवी जाधव यांनी नटरंग, बालक पालक, टाइमपास, न्यूड असे एकापेक्षा एक सरस सिनेमे दिले आहेत. अनेक वर्षे जाहिरात क्षेत्रात काम केल्यानंतर चक्क नोकरीचा राजीनामा देऊन त्यांनी सिनेमाची वाट चोखाळली. जे जे स्कूल आॅफ आर्ट्सचे विद्यार्थी असलेले रवी जाधव यांचा या क्षेत्रात येण्याचा प्रवासही अनोखा ठरला. यानंतर त्यांनी कधीच मागे वळून बघितलं नाही.

टॅग्स :रवी जाधवजॅकी श्रॉफ