Join us

'प्यार किया तो..'; जब्याची शालू पडली प्रेमात? 'या' व्हिडीओमुळे होतीये चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2023 12:35 IST

Rajeshwari kharat: राजेश्वरीने शेअर केलेल्या पोस्टची होतीये चर्चा

नागराज मंजुळे यांच्या 'फॅण्ड्री' चित्रपटातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे राजेश्वरी खरात. 'फॅण्ड्री' मध्ये राजेश्वरीने शालू ही भूमिका साकारुन विशेष लोकप्रियता मिळवली.  परंतु, या सिनेमानंतर राजेश्वरी फारशी कुठे दिसली नाही. परंतु, सोशल मीडियावर ती कमालीची सक्रीय आहे. अनेकदा राजेश्वरी तिच्या बोल्ड लूकमुळे चर्चेत येत असते. परंतु, यावेळी ती एका व्हिडीओमुळे चर्चेत आली आहे.

राजेश्वरी सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असून कायम ती नवनवीन पोस्ट शेअर करत असते. यात अलिकडेच तिने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या पोस्टमध्ये ती वेस्टर्न लूकमध्ये दिसत असून  या व्हिडीओला तिने दिलेलं कॅप्शन नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. सोबतच तिने जबरदस्त एक्स्प्रेशन्सदेखील दिले आहेत.

दरम्यान, प्यार किया तो निभाना  असं कॅप्शन तिने दिलं असून हेच बॉलिवूड सॉग तिने व्हिडीओमध्ये प्ले केलं आहे. राजेश्वरीला फॅन्ड्री सिनेमामुळे खरी लोकप्रियता मिळाली. शालू साकारणाऱ्या राजेश्वरी खरात हिला नागराज यांनी पहिल्यांदा पुण्यात पाहिलं होतं. फॅन्ड्रीसाठी तिचा एकच चेहरा नागराज यांच्या डोळ्यांपुढे येत होता. पण तिचा शोध लागेना. अनेक प्रयत्नानंतर तिचा शोध लागला. पण पोरीला चित्रपटात काम करू देण्यास तिचे आईवडील तयार होईनात. नागराज यांनी बरीच समजूत काढल्यानंतर राजेश्वरीच्या आईवडिलांनी परवानगी दिली आणि राजेश्वरी कॅमेऱ्यापुढे उभी झाली. 

टॅग्स :राजेश्वरी खरातसिनेमानागराज मंजुळे