अभिनेत्री प्राजक्ता माळीने (Prajakta Mali) निर्मित केलेल्या तिच्या पहिलाच 'फुलवंती' सिनेमाला भरघोस यश मिळालं. या सिनेमासाठी प्राजक्ताने अनेक अडचणींवर मात करत हे यश मिळवलं. प्राजक्ता खूप धार्मिकही आहे. तिने सिनेमाच्या यशानंतर ती श्री श्री रविशंकर यांच्या आश्रमात जाऊन राहिली. तर आता तिने नुकतंच सोमनाथ येथे महादेवाचं दर्शन घेतलं आहे. याचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
प्राजक्ता माळीने इन्स्टाग्रामवर सोमनाथचे फोटो पोस्ट शेअर केले आहेत. पंजाबी ड्रेस, कपाळावर भस्म लावलेला काही फोटो, व्हिडिओ तिने शेअर केलेत. यासोबत तिने कॅप्शनमध्ये लिहिले, "महादेवाला वचन दिल्याप्रमाणे, प्रवास सुरु झाला आहे...श्री सोमनात ज्योतिर्लिंग, वेरावळ, सौराष्ट्र - गुजरात. (सुट्ट्यांचा सदुपयोग) १२ ज्योतिर्लिंग."
प्राजक्ताच्या फोटोंवर अनेकांनी प्रवास सुखाचा होवो कमेंट केल्या आहेत. तिची ही धार्मिक बाजू चाहत्यांना नेहमीच भावते. प्राजक्तासोबत 'फुलवंती'ची असिस्टंट दिग्दर्शिकाही आहे जी सोमनाथला गेली आहे. प्राजक्ताने नुकतंच हास्यजत्रेचंही शूट पूर्ण केलं. आता तिच्या आगामी प्रोजेक्ट्सची चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे.