Join us
Daily Top 2Weekly Top 5

"सरसेनापतीची, अंतर्गत राजकारणाची, स्वराज्याची गोष्ट.."; प्रवीण तरडेंसाठी प्राजक्ता माळीने लिहिलेली पोस्ट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2022 13:29 IST

प्राजक्ताने तिच्या इन्स्टा अकाऊंटवरून दोन फोटो शेअर केले आहेत.

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) हिने आपल्या अभिनय कौशल्याने रसिकांना भुरळ घातली आहे. तसेच ती बऱ्याचदा सोशल मीडियावरील ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येत असते. तसेच बऱ्याचदा तिच्या सोशल मीडियावरील पोस्टदेखील व्हायरल होताना दिसतात. दरम्यान प्राजक्ता माळीची लेटेस्ट पोस्ट चर्चेत आली आहे. या फोटोत प्राजक्तासोबत तिचे आजी-आजोबासुद्धा दिसतायेत. 

प्राजक्ताने तिच्या इन्स्टा अकाऊंटवरून दोन फोटो शेअर केले आहेत. यात एका फोटोत तिच्यासोबत तिचे आजी-आजोबा दिसतायेत तर दुसरा फोटो प्रवीण तरेंडेंसोबतचा आहे. प्राजक्ता तिच्या आजी-आजोबांना घेऊन ‘सरसेनापती हंबीरराव’ हा चित्रपट पाहण्यासाठी थिएटरमध्ये गेली होती. याचं संदर्भातील पोस्ट तिने सोशल मीडियावर शेअर केली आहे सोबत सरसेनापती हंबीरराव’ सिनेमाच्या टीमचं कौतुक देखील केलं आहे. 

A day with “आजी-आजोबा” आणि आम्ही “सरसेनापती हंबीरराव” पाहिला. कौतुकाला शब्द अपूरे पडतील, इतका अप्रतिम झालाय चित्रपट♥️.प्रविण दादा @pravinvitthaltarde तू भारी आहेस- विषय कट. २.३० तासात तू दोन महाराजांची, त्यांच्या सरसेनापतीची, अंतर्गत राजकारणाची, स्वराज्याची गोष्ट; ज्या हुशारीनं दाखवलीस त्याला तोडच नाही. तुझ्यातला प्रेमळ, समंजस, दूरदृष्टी असणारा गोड माणूस लेखनात उतरला.. आणि त्यानी आम्हांला कितीतरी शिकवलं. त्यासाठी किती धन्यवाद देऊ? #केवळप्रेम . @limaye.mahesh नेहमीप्रमाणे कडक कामगिरी. @mahajani.gashmeer @shrumarathe मोहिम यशस्वी प्रत्येक मराठी माणसानं बघितलाच पाहिजे असा हा चित्रपट. (मी पुन्हा किमान दोनदा तरी पाहणार आहे..) .आजी- आजोबा एकदम खूष… अशी पोस्ट प्राजक्ताने या फोटोंसोबत लिहिली आहे. 

सध्या प्राजक्ता तिच्या रानबाजार या बेवसिरीजला घेऊन चर्चेत आहे. यात प्राजक्ताने दिलेले बोल्ड सीनमुळे चर्चेत होती. सोशल मीडियावर यामुळे तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. 

टॅग्स :प्राजक्ता माळीप्रवीण तरडे