Join us

ऋतुराजच्या भावी पत्नीसोबतच्या फोटोवर सायली संजीवचीच नाही तर या मराठमोळ्या अभिनेत्रींचीही कमेंट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2023 12:45 IST

Ruturaj Gaikwad : चेन्नई सुपर किंग्जच्या विजयानंतर ऋतुराज गायकवाडने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली. यात त्याने भारताचा माजी कर्णधार, चेन्नई सुपर किंग्जचा विद्यमान कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि त्याची होणारी पत्नी उत्कर्षासोबतचा फोटो शेअर केला. जो खूप चर्चेत आला आहे.

रविंद्र जडेजा(Ravindra Jadeja)ने नरेंद्र मोदी स्टेडियमवर विजयी चौकार लगावून आयपीएल २०२३(IPL)ला चॅम्पियन दिला. चेन्नई सुपर किंग्जने गतविजेत्यांना पराभूत करून आयपीएलवर पुन्हा एकदा आपले नाव कोरले. या विजयात ऋतुराज गायकवाड(Ruturaj Gaikwad)चाही मोठा वाट होता. अंतिम सामन्यात मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडला काही खास कामगिरी करता आली नाही. पण त्यानं १६ चेंडूत २६ धावा करून साजेशी सुरूवात करून दिली. अंतिम सामना जिंकल्यानंतर ऋतुराज गायकवाड याने त्याच्या भावी पत्नीचा फोटो शेअर करत सर्वांना थक्क केले होते. त्याच्या या पोस्टवर अभिनेत्री सायली संजीव(Sayali Sanjiv)ने कमेंट केली होती. जी चर्चेत आली होती. मात्र तिनेच नाही तर मराठीतील आणखी काही अभिनेत्रींनी या पोस्टवर कमेंट केल्याचे पाहायला मिळाले. 

चेन्नई सुपर किंग्जच्या विजयानंतर ऋतुराज गायकवाडने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली. यात त्याने भारताचा माजी कर्णधार, चेन्नई सुपर किंग्जचा विद्यमान कर्णधार महेंद्रसिंग धोनी सोबतचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत एका बाजूला ऋतुराज, मध्ये धोनी आणि बाजूला त्याची होणारी पत्नी उत्कर्षा पाहायला मिळत आहे. हा फोटो शेअर करत ऋतुराजने लिहिले की, माझ्या आयुष्यातील दोन व्हीव्हीआयपी. यासाठी मी देवाचा खरंच आभारी आहे. 

त्यावर अभिनेत्री सायली संजीवने कमेंट केली होती. तिने या कमेंटमध्ये म्हटले की, 'तुम्हा दोघांचे मनापासून अभिनंदन उत्कर्षा आणि ऋतुराज'.तिची कमेंट सर्वाधिक चर्चेत आली कारण गेल्या काही दिवसांपासून सायली आणि ऋतुराजच्या अफेरच्या चर्चा रंगल्या होत्या. बऱ्याचदा मुलाखतीत सायलीने या वृत्तात तथ्य नसल्याचे म्हटले होते. आता ऋतुराजने उत्कर्षासोबतचा फोटो शेअर केल्यानंतर या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

सायली व्यतिरिक्त या अभिनेत्रींनी केली कमेंट

सायली व्यतिरिक्त त्याच्या या पोस्टवर मराठी सिनेइंडस्ट्रीतील आणखी अभिनेत्रींनी कमेंट केल्या आहेत. अभिनेत्री गौतमी देशपांडेने कमेंटमध्ये लिहिले की, 'या अविस्मरणीय विजयासाठी अभिनंदन आणि तुझ्या आयुष्यातील नव्या प्रवासासाठी आगाऊ शुभेच्छा.' तर अभिनेत्री इशा केसकरने लिहिले की, 'अभिनंदन ऋतू, गेल्या रात्री खूप छान खेळलास आणि अभिनंदन.' 

टॅग्स :सायली संजीवऋतुराज गायकवाडईशा केसकरगौतमी देशपांडे