Join us
Daily Top 2Weekly Top 5

इवल्याशा मायराचा साडीत 'नाच गं घुमा'! व्हिडिओ पाहून तुम्हीही कराल कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2024 16:22 IST

मायराने धरला 'नाच गं घुमा' गाण्यावर ताल, पाहा व्हिडिओ

बहुप्रतिक्षित 'नाच गं घुमा' या मराठी सिनेमाची सर्वत्र जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. या सिनेमाच्या ट्रेलरनंतर प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे. सिनेमा प्रदर्शित होण्याआधीच यातील 'नाच गं घुमा' हे गाणं प्रचंड व्हायरल झालं आहे. सोशल मीडियावरही हे गाणं ट्रेंडिंग आहे. या गाण्यावरील रील व्हिडिओही व्हायरल होत आहेत. अनेक सेलिब्रिटींनीही या गाण्यावर थिरकले आहेत. आता बालकलाकार मायरा वायकुळने 'नाच गं घुमा' गाण्यावर ताल धरला आहे. 

'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेतून घराघरात पोहोचलेली मायरा प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन करते. सोशल मीडियावरही मायराचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. आता मायराने चक्क साडी नेसून 'नाच गं घुमा' गाण्यावर डान्स केला आहे. याचा व्हिडिओ तिच्या इन्स्टाग्रामवरुन शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओत मायरा 'नाच गं घुमा' गाण्याच्या हुक स्टेप करताना दिसत आहे. निळी साडी आणि केसांत गजरा माळून मायरा डान्स करताना दिसत आहे. इवल्याशा मायराचा हा व्हिडिओ पाहून चाहतेही थक्क झाले आहेत. 

'नाच गं घुमा' या सिनेमात मायराही झळकली आहे. हा मायराचा पहिलाच सिनेमा आहे. या सिनेमात ती सायलीची भूमिका साकारणार आहे.  'नाच गं घुमा'मध्ये मुक्ता बर्वे आणि नम्रता संभेराव यांच्या मुख्य भूमिका आहेत. त्याबरोबरच सुकन्या मोने, सारंग साठ्ये, मधुगंधा कुलकर्णी, शर्मिष्ठा राऊत यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. परेश मोकाशी यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं असून १ मेला हा सिनेमा सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. 

टॅग्स :मायरा वैकुलसिनेमाटिव्ही कलाकार