Join us
Daily Top 2Weekly Top 5

"मी अजून सिनेमा पाहिलाच नाहीये, कारण...", 'नाच गं घुमा'साठी मुक्ता बर्वेची पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2024 11:49 IST

"१ मेला सिनेमा प्रदर्शित झाला पण...", मुक्ता बर्वेच्या पोस्टने वेधलं लक्ष

सध्या बॉक्स ऑफिसवर 'नाच गं घुमा' हा मराठी सिनेमा बॉलिवूड चित्रपटांना टक्कर देत आहे. मुक्ता बर्वे आणि नम्रता संभेराव मुख्य भूमिकेत असलेला हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. या सिनेमाला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळत असून थिएटरमध्ये 'नाच गं घुमा'चे शो हाऊसफुल होत आहेत. पण, सिनेमात मुख्य भूमिका साकारलेल्या मुक्ता बर्वेने अजून हा सिनेमा पाहिलेलाच नाही. स्वत: मुक्तानेच याची कबुली दिली आहे. 

मुक्ता बर्वे सध्या नाटकाच्या दौऱ्यानिमित्त परदेशात आहे. त्यामुळे 'नाच गं घुमा' सिनेमाचं  प्रमोशन आणि प्रिमियरलाही मुक्ता दिसली नाही. पण, याबाबत आता मुक्ताने खंत व्यक्त केली आहे. तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत लवकरच भारतात परतणार असल्याचं म्हटलं आहे. 

मुक्ता बर्वेची पोस्ट

तुम्हाला माहीत आहे मी आत्ता भारतात नाहीये. कदाचित पहिल्यांदाच असं झालं असेल की माझ्या film च्या release ला मी नाही. त्यामुळे ‘नाच गं घुमा’ release झाल्यापासून मला ना एक अस्वस्थ feeling येतंय…

 

ते म्हणजे १ मे ला film तर release झाली आणि आम्ही कलाकृती यासाठीच बनवतो की ती प्रेक्षकांनी बघावी…आणि भरभरून प्रेम द्यावं. प्रेक्षक सिनेमा बघून कौतुकाने आम्हाला डोक्यावर घेत ही आहेत. पण हे सर्व मी film बघण्याआधीच होतंय..! चित्रपटाचं भरभरून कौतुक होत आहे. प्रेक्षक appreciate करत आहेत. पण, मी अजून film पाहिलीच नाहीये आणि मला त्याची रुख रुख वाटते आहे. पण हरकत नाही. माझ्या नाटकावर माझ प्रेम आहे. तीही माझी commitment आहे आणि मी इकडे माझ्या चारचौघी नाटकाचे दौरे अगदी उत्साहाने करते आहे. पण मनाने कुठेतरी मी भारतातही आहे...माझ्या team सोबत...माझ्या प्रेक्षकांबरोबर...माझ्या मराठी माणसांबरोबर...!

त्यामुळे आता मी खूप आतुर आहे की कधी मला माझीच film (म्हणजे आपली film) theatre मधे जाऊन तुम्हा सर्वांसोबत बघता येईल...! इथले सर्व प्रयोग यशस्वीरीत्या पार पाडून मी लवकरच भारतात येतेय...जी काही कमी राहिली आहे माझ्या अनुपस्थितीममुळे ती मी भरून काढणार आहे! १२ मे पासून आहेच तुमच्याबरोबर… भेटूया आणि मज्जा करूया…तोपर्यंत थेटरात ‘घुमोत्सव’ असाच उत्साहात साजरा होत राहू दे..!

‘नाच गं घुमा’ तुमच्या भेटीला १ मे पासून आलेला आहे आणि तो तुम्ही पहिला असेल… पण ज्यांनी नाही पाहिला त्यांनी पाहिलं तिकिट काढा आणि तुमच्या प्रतिक्रिया comments, reels, stories द्वारे आमच्यापर्यंत नक्की पोचवा.

मुक्ता बर्वेच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट्स केल्या आहेत. मुक्ता बर्वेबरोबर 'नाच गं घुमा' सिनेमात सारंग साठ्ये, सुकन्या मोने, बालकलाकार मायरा वायकुळ, मधुगंधा कुलकर्णी हे कलाकार आहेत. परेश मोकाशी यांनी सिनेमाचं दिग्दर्शन केलं असून स्वप्निल जोशी आणि शर्मिष्ठा राऊत यांची निर्मिती आहे. 

टॅग्स :मुक्ता बर्वेमराठी चित्रपटसिनेमा