Join us

"तुझा दिग्दर्शकीय आलेख बघून...", मराठमोळा लेखक क्षितीज पटवर्धनची हेमंत ढोमेसाठी खास पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2025 13:02 IST

हेमंत ढोमे (Hemant Dhome) हा मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आहे.

Kshitij Patwardhan: हेमंत ढोमे (Hemant Dhome) हा मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आहे. सध्या मराठी मनोरंजनविश्वात हेमंत ढोमे दिग्दर्शित फसक्लास दाभाडे या सिनेमाबद्दल चर्चा सुरु आहे. येत्या २४ जानेवारीला म्हणजे उद्या हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित केला जाणार आहे. खुळ्या भावंडांची इरसाल स्टोरी या चित्रपटामध्ये प्रेक्षकांना पाहता येणार आहे. दरम्यान, यानिमित्ताने मराठमोळा लेखक क्षितीज पटवर्धनने (Kshitij Patwardhan) सोशल मीडियावर हेमंत ढोमेचं कौतुक करत खास पोस्ट शेअर केली आहे.  

हेमंत ढोमे दिग्दर्शित 'फसक्लास दाभाडे' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यानिमित्ताने क्षितीज पटवर्धनने इन्स्टाग्रामवर हेमंत ढोमेसोबतचा सुंदर असा फोटो शेअर करत लिहीलंय की, "मित्र म्हणून प्रचंड अभिमान आणि प्रेक्षक म्हणून अतिशय समाधान. हेमंत, तुझा दिग्दर्शकीय आलेख बघून 'मनाला लायटिंग' होतंय. 'फसक्लास दाभाडे' हा तुझा आजवरचा सर्वोत्तम सिनेमा आहे. मराठी सिनेमा थिएटर मध्ये जाऊन सेलिब्रेट करायला तू मराठी प्रेक्षकांना अतिशय सुंदर कारण दिलंयस. उद्यापासून नक्की बघा आमचा फसक्लास दाभाडे!" अशा आशयाची पोस्ट त्याने शेअर केली आहे. दरम्यान, पोस्टवर  हेमंत ढोमेने या पोस्टवर प्रतिक्रिया देत आपल्या मित्राचे आभार मानले आहेत.

'फसक्लास दाभाडे' हा सिनेमा येत्या २४ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. हेमंत ढोमे लिखित, दिग्दर्शित या चित्रपटात क्षिती जोग, सिद्धार्थ चांदेकर, अमेय वाघ, निवेदिता सराफ, हरिष दुधाडे, राजन भिसे, राजसी भावे या तगड्या कलाकरांची फौज आहे. त्यामुळे हा सिनेमा प्रेक्षक देखील उत्सुक आहेत. 

टॅग्स :Hemant Dhome Today Newsमराठी अभिनेतासेलिब्रिटीसिनेमासोशल मीडिया