Join us
Daily Top 2Weekly Top 5

'अभिनयापुढे पैसा महत्त्वाचा नाही..'; 'या' अभिनेत्रीचं आहे कामावर नितांत प्रेम

By शर्वरी जोशी | Updated: December 7, 2021 20:00 IST

Sharvari lohokare: अलिकडेच शर्वरी, प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या 'सूर्यवंशी' या चित्रपटात झळकली. या चित्रपटाच्या निमित्ताने तिने दिलेल्या मुलाखतीत अनेक मुद्द्यांवर चर्चा केली, तिची मतं मांडली.

सर्वात ग्लॅमरस, यश आणि पैसा देणारं क्षेत्र म्हणून आज कलाविश्वाकडे पाहिलं जातं. त्यामुळे  असंख्य जणांना या क्षेत्रात नशीब आजमावण्याची इच्छा असते. परंतु, या क्षेत्रात जितका पैसा आहे तितकाच स्ट्रगल आणि मेहनतही करावी लागते हे फार क्वचित जणांना माहिती आहे. आजपर्यंत अनेक लोकप्रिय कलाकारांनी त्यांच्या अभिनयशैलीच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. विशेष म्हणजे या कलाकारांनी कधीही पैशांकडे न पाहता आपल्या अभिनयावर निस्सिम प्रेम केलं. त्यामुळेच आज या क्षेत्रात ते हक्काचं स्थान निर्माण करुन आहेत. अनेक गाजलेल्या नाटकांमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्री शर्वरी लोहकरे हिनेदेखील तिच्या अभिनयावरील प्रेमावर अलिकडेच भाष्य केलं आहे. 'पैशांपेक्षा मला अभिनय जास्त महत्त्वाचा आहे',असं मत तिने 'लोकमत ऑनलाइन'च्या मुलाखतीत मांडलं आहे.

अलिकडेच शर्वरी, प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या 'सूर्यवंशी' या चित्रपटात झळकली. या चित्रपटाच्या निमित्ताने तिने दिलेल्या मुलाखतीत अनेक मुद्द्यांवर चर्चा केली, तिची मतं मांडली. यावेळीच बोलत असताना तिने पैसा आणि अभिनय यापैकी कोणत्या गोष्टीला प्रथम प्राधान्य देते हे सांगितलं.

 "कोणत्याही क्षेत्रात पदार्पण करण्यापूर्वी लहान-लहान पावलं उचलणं खूप महत्त्वाचं आहे. मग ती हिंदी कलासृष्टी असो वा मराठी. मी साकारत असलेल्या भूमिकेमधून मला एक कलाकार म्हणून काय मिळणार आहे याचा मी कायम पहिले विचार करत असते. एक कलाकार म्हणून मला त्यातून काय मिळतंय हे माझ्यासाठी फा महत्त्वाचं आहे. एक कलाकार याच नात्याने मी त्या भूमिकेकडे पाहात असते", असं शर्वरी म्हणाली.

'माझ्याविषयी मोठे गैरसमज पसरले'; लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने व्यक्त केली खंत 

पुढे ती म्हणते," कोणत्याही भूमिकेची निवड करण्यापूर्वी मला किती पैसे मिळतील. योग्य मानधन मिळेल ना याचा मी कधीच विचार करत नाही. कारण, माझ्यासाठी अभिनय महत्त्वाचा आहे. त्यामुळे पैसा हा मुद्दा माझ्यासाठी नंतर येतो. पण अभिनय हा माझ्यासाठी कायम अग्रस्थानी असेल. मुळात पैसे महत्त्वाचे आहेतच. पण, त्यापूर्वी मी साकारत असलेल्या भूमिकेतून मला कलाकार म्हणून काय मिळतंय हे जास्त महत्त्वाचं आहे."

दरम्यान, रोहित शेट्टीच्या 'सूर्यवंशी' या चित्रपटात शर्वरी लोहकरे महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकली आहे. या चित्रपटात तिने वंदना तांबे ही भूमिका साकारली आहे. विशेष म्हणजे शर्वरीचा हा पहिलाच हिंदी चित्रपट असून या चित्रपटात साकारलेल्या भूमिकेमुळे तिची मराठी कलाविश्वासह बॉलिवूडमध्येही तुफान चर्चा रंगली आहे. विशेष म्हणजे तिच्यावर सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. 

टॅग्स :सेलिब्रिटीटेलिव्हिजनसूर्यवंशीसिनेमा