Join us  

पारंपरिक साज अन् समुद्राची गाज; मुग्धा-प्रथमेशचं मराठमोळ्या लूकमध्ये after wedding shoot

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2024 12:09 PM

Mugdha vaishampayan: प्री वेडिंग विसरा प्रथमेश-मुग्धाने केलेलं after wedding photoshoot एकदा पाहा

मराठी संगीत विश्वातली गाजलेली जोडी म्हणजे प्रथमेश लघाटे (prathamesh laghate ) आणि मुग्धा वैशंपायन (mugdha vaishampayan). अलिकडेच या जोडीने अत्यंत साध्या पद्धतीने लग्नगाठ बांधली. त्यामुळे ही जोडी सध्या त्यांचं वैवाहिक आयुष्य एन्जॉय करत आहेत. विशेष म्हणजे सध्या सगळीकडे प्री-वेडिंगशूटचा ट्रेंड सुरु आहे. मात्र, मुग्धा आणि प्रथमेशने हा ट्रेंड मोडीत काढत चक्क आफ्टर वेडिंगशूट केलं आहे. त्यांच्या हा नवा ट्रेंड सध्या चर्चेत आला आहे.

मुग्धा आणि प्रथमेश सोशल मीडियावर कमालीचे सक्रीय आहेत. त्यामुळे ते त्यांच्या प्रोफेशनल आणि पर्सनल आयुष्यातील अनेक किस्से, घडामोडी चाहत्यांसोबत शेअर करत असतात. यामध्येच या जोडीने त्यांच्या आफ्टर वेडिंगशूटचा व्हिडीओ शेअर केला आहे. विशेष म्हणजे कायम संस्कृतीचं भान जपणाऱ्या या जोडीने या व्हिडीओशूटच्यावेळीदेखील पारंपरिक पोशाखाला पसंती दिली.

मुग्धा-प्रथमेशच्या लग्नाला नुकतेच दोन महिने पूर्ण झाले आहेत. त्यामुळे त्यांनी हा व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर केला आहे. मुग्धा आणि प्रथमेशने समुद्र किनाऱ्यावर सुरेख असं व्हिडीओशूट केलं असून यावेळी मुग्धाने पैठणी साडी नेसली होती. तर, प्रथमेशनेही शेरवानी परिधान केली होती. कोणातही बडेजावपणा न करता अत्यंत साध्या लूकमध्ये या जोडीने हा व्हिडीओशूट केल्यामुळे नेटकरी त्यांच्यावर कमेंट आणि लाइक्सचा पाऊस पाडत आहेत.

दरम्यान, मुग्धा आणि प्रथमेश ही जोडी ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’मधून  लोकप्रिय झाली. विशेष म्हणजे हे दोघेही मराठी कलाविश्वात सक्रीय आहे. तसंच मुग्धाचं युट्यूब चॅनेल सुद्धा आहे जेथे ती प्रथमेशसोबतच्या गाण्याचे व्हिडीओ शेअर करत असते.

टॅग्स :सिनेमासेलिब्रिटीसा रे ग म पटेलिव्हिजन