Join us

'स्वर्गाइतकेच कोकणात जाणे कठीण'; रस्त्याची चाळणी पाहून वैतागलेल्या गौरी किरणची भन्नाट पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2023 19:34 IST

Gauri kiran: मराठमोळी अभिनेत्री गौरी किरण हिला मुंबई-गोवा हायवेवर असंख्य खड्ड्यांचा सामना करावा लागला.

पावसाळा सुरु झाली की त्यापाठोपाठ रस्त्यांवर पडणारे खड्डे ही समस्या काही नवीन राहिलेली नाही. गेल्या कित्येक वर्षांपासून रस्त्यांवरील खड्डे ही गंभीर समस्या झाली आहे. यात बऱ्याचदा महामार्गावरही असे खड्डे असल्यामुळे प्रवास करताना मोठे अपघात होण्याची शक्यता असते. त्यामुळे सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी रस्त्यांवरील खड्ड्यांवर भाष्य केलं आहे. यात अलिकडेच लोकप्रिय मराठी अभिनेत्री गौरी किरण हीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत या खड्ड्यांविषयी भाष्य केलं आहे.

‘पुष्पक विमान’ या सिनेमातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करणारी गौरी किरण हिने नुकतीच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने कोकणात जाणाऱ्या रस्त्यावर असलेले खड्डे दाखवले आहेत. सोबतच स्वर्गात जाणारा रस्ता जितका कठीण असतो, तितकंच कोकणात जाणं कठीण असल्याचं तिने म्हटलं आहे.

काय आहे गौरीची पोस्ट?

गौरीने मुंबई-गोवा हायवेवरील एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये ती रस्त्यावर असलेले असंख्य खड्डे दाखवत आहे. या खड्ड्यातून वाट काढणं कठीण असल्यामुळे  रस्त्यावर मोठा ट्रॅफिक जाम झाला आहे. त्यामुळेच "कोकण खऱंच स्वर्ग आहे. कारण, कोकणात जाणारा रस्ता जितका कठीण असतो. तितकाच कोकणात जाणारा रस्ता सुद्धा कठीण आहे", असं गौरी या व्हिडीओमध्ये म्हणते. 

टॅग्स :सिनेमासेलिब्रिटीकोकण