Join us

... तर कोंबडी पळाली हे गाणं कधी आलंच नसतं! दिग्दर्शक केदार शिंदेंनी सांगितला गाजलेल्या गाण्याचा किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2025 10:30 IST

"कोंबडी पळाली गाणं कधी आलंच नसतं, कारण...", केदार शिंदेंनी सांगितला गाजलेल्या गाण्याचा किस्सा

Kedar Shinde : मराठी चित्रपटसृष्टीत असे काही चित्रपट आहेत ज्यांनी प्रेक्षकांच्या मनावर एक वेगळाच ठसा उमटवला. हे खास चित्रपट प्रेक्षक आजही तितक्याच आवडीने पाहतात. या चित्रपटांच्या यादीतील एक नाव म्हणजे जत्रा. केदार शिंदे (Kedar Shinde)दिग्दर्शित या मल्टिस्टारर चित्रपटात भरत जाधव, क्रांती रेडकर, प्रिया बेर्डे तसेच सिद्धार्थ जाधव, विजय चव्हाण, उपेंद्र लिमये यांसारख्या तडग्या कलाकारांची फौज पाहायला मिळाली. २००५ साली प्रदर्शित झालेला हा सिनेमा मराठीतील कल्ट सिनेमांपैकी एक आहे. 'जत्रा'चं कथानक तसंच त्यातीस गाण्यांनीही प्रेक्षकांना प्रेमात पाडलं.

'जत्रा' चित्रपटातील 'ये गो ये मैना',' कोंबडी पळाली' ही गाण्याची सुपरहिट ठरली. अजय-अतुल यांनी  या गाण्यांची निर्मिती केली आहे. मात्र, तुम्हाला माहितीये का? जत्रा चित्रपटातून  कोबंडी पळाली हे गाणं काढून टाकावं लागलं असतं, याचं PETA होतं.  त्यावेळी असंच काहीसं घडलं असतं, याचा खुलासा दिग्दर्शक केदार शिंदेंनी 'लोकमत फिल्मी'ला दिलेल्या मुलाखतीत केला आहे. या मुलाखतीमध्ये कोंबडी पळाली गाण्याचा किस्सा सांगताना ते म्हणाले," कदाचित हे गाणं कधी आलंच नसतं. हे गाणं शूट झालं, एडिट झालं. त्यानंतर चित्रपट सेन्सॉर झाला आणि त्याच संध्याकाळी चा प्राण्यांच्याबाबतीत नियम आला. जर तो नियम त्याच्या एक दिवस आधी जरी आला असता तर मला हे गाणं चित्रपटातून काढून टाकावं लागलं असतं. कारण या गाण्यात खूप कोंबड्या दिसत आहेत, त्यामुळे त्यांनी मला ही कधीच परवानगी दिली नसती." 

पुढे ते म्हणाले," आज जर एखादी कोंबडी जरी दिसला तरी त्याचं सर्टिफिकेट घेऊन फिरावं लागतं. इथे तर कोंबड्यांचा बाजार मांडला होता. पण, लोकांना हे गाणं फारच आवडलं. आता ज्या प्रकारे सोशल मिडिया आहे तसाच सोशल मिडिया तेव्हा असता तर गाणं अजून हिट झालं असतं. शिवाय त्याचा चित्रपटाच्या रिलीजला फायदा झाला असता. पण, हे गाणं प्रेक्षकांसमोर आलं ते सिनेमा सॅटलाईटवर प्रदर्शित झाला तेव्हा... त्यानंतर प्रेक्षकांना गाणं उचलून धरलं." असा खुलासा केदार शिंदेनी मुलाखतीत केला. 

टॅग्स :केदार शिंदेभरत जाधवक्रांती रेडकरसिद्धार्थ जाधवमराठी चित्रपट