Join us
Daily Top 2Weekly Top 5

"हा निखळ आनंद लोकांना तुमच्यासारखा निस्वार्थी माणूस..," तेजस्विनी पंडितने केलं राज ठाकरेंचं कौतुक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2024 10:25 IST

अभिनेत्री तेजस्विनी पंडितने सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.

Tejaswini Pandit: तेजस्विनी पंडित (Tejaswini Pandit) मराठी मनोरंजन विश्वातील नावाजलेली अभिनेत्री आहे. दमदार अभिनय तसेच निखळ सौंदर्याच्या जोरावर तिने प्रेक्षकांच्या मनात हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. तेजस्विनी पंडित अभिनेत्री असूनही ती उत्तम निर्माती आणि दिग्दर्शिकाही आहे. तेजस्विनी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असून समाजातील घडामोडींवर अगदी बिनधास्तपणे तिचं मत मांडताना दिसते. नुकताच अभिनेत्रीने सोशल मीडियाच्या मनसेच्या दीपोत्सवाचा एक व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर केला आहे. या व्हिडीओच्या माध्यामातून अभिनेत्रीने राज ठाकरेंबद्दल (Raj Thackeray) कौतुकोद्गार काढले आहेत. 

सध्या सर्वत्र दिवाळीनिमित्त उत्साहाचं, आनंदाचं वातावरण आहे. त्यात मुंबईत दरवर्षी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून दिवाळी निमित्त दादरमध्ये मोठ्या थाटामाटात केला जातो. दादर येथील शिवाजी पार्क परिसरात मोठ्या प्रमाणात विद्युत रोषणाई करण्यात येते. याचा व्हिडीओ तेजस्विनी पंडितने सोशल मीडियावर पोस्ट करत राज ठाकरेंचं कौतुक केलं आहे. या व्हिडीओला, "दीपोत्सव! हा निखळ आनंद लोकांना तुमच्यासारख्या निस्वार्थी माणूसंच देऊ जाणे, राजसाहेब!"असं लक्षवेधी कॅप्शन अभिनेत्रीने दिलंय. शिवाय तेजस्विनीने या व्हिडीओच्या बॅकग्राउंडला 'संजू' चित्रपटातील "कर हर मैदान फतेह!" हे गाणं लावलं आहे. 

अभिनेत्री तेजस्विनी पंडित व राज ठाकरेंच्या कुटुंबियांचे जवळचे संबंध आहेत. अनेकदा तेजस्विनी राज ठाकरे यांच्याबरोबरचे फोटो पोस्ट करत असते. राजकारणावर मतं मांडताना ती राज ठाकरेंबद्दल बोलत असते. 

टॅग्स :तेजस्विनी पंडितराज ठाकरेमनसेमुंबईदिवाळी 2024सोशल मीडिया