Pooja Sawant Video: हिंदू धर्मामध्ये प्रत्येक सणाला खूप महत्त्व आहे. गणेशोत्सव हे सण हर्षोल्हासात साजरे केल्यानंतर सर्वसामान्यासह प्रत्येक भाविकाला आता ओढ लागली आहे ती नवरात्रौत्सवाची. यंदा २२ सप्टेंबरपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात नवरात्रीत आदिशक्तीच्या आधारनेसह,गरबा आणि दांडिया देखील मोठ्या उत्साहात खेळला जातो. गणेशोत्सवानंतर आता नवरात्रौत्सवाची सर्वत्र जय्यत तयारी सुरु आहे. अशातच मराठी अभिनेत्री पूजा सावंतला देखील नवरात्रौत्सवाचे वेध लागले आहेत. नुकताच अभिनेत्रीने सोशल मीडियावर नवरात्रीची तयारी करतानाचा व्हिडीओ शेअर शेअर केला आहे.
पूजाच्या घरी आई आदिशक्तीच्या आगमनाची लगबग सुरु आहे. याचा सुंदर व्हिडीओ तिने आपल्या अधिकृत सोशळ मिडिया अकाउंटवर पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये ती देवीसाठी मखर तसंच फुलांची सजावट करण्यात ती मग्न झाल्याचं पाहायला मिळतंय." तयारी …आईच्या आगमनाची" असं सुंदर कॅप्शन तिने या व्हिडीओला दिलं असतं. दरम्यान, पूजा सावंतने शेअर केलेल्या या व्हिडीओवर तिच्या चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्स करत तिचं भरभरुन कौतुक केलं आहे.
वर्कफ्रंट
मराठी सिनेसृष्टीतील कलरफूल अभिनेत्री म्हणून पूजा सावंतला ओळखलं जातं. मराठीसह हिंदीतही तिने अभिनयाच्या जोरावर स्वतःची छाप उमटवली आहे. अलिकडेच ती 'आंबट शौकीन' चित्रपटामुळे चर्चेत आली होती.