Kishori Shahane Lovestory: मराठी सिनेसृष्टीतील एव्हरग्रीन अभिनेत्री म्हणजे किशोरी शहाणे. निखळ सौंदर्य आणि दमदार अभिनयाच्या जोरावर त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. आजवर अनेक मालिका, चित्रपटांमधून त्यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. वयाच्या १७ व्या वर्षी अभिनयाची सुरुवात करणाऱ्या किशोरी यांनी केवळ मराठीच नव्हे तर हिंदीमध्येही आपल्या अभिनयाचा नावलौकिक मिळला आहे.लाखो चाहत्यांची क्रश असलेल्या किशोरी यांनी हिंदी कलाविश्वातील प्रसिद्ध दिग्दर्शकासोबत लग्न केलं.दिपक बलराज विज असं त्यांच्या पतीचं नाव असून त्यांचं लव्ह मॅरेज आहे.
किशोरी शहाणे आणि दीपक बलराज यांची प्रेमकहाणी फारच इंटरेस्टिंग आहे. काही बिग बॉस मराठीच्या शोमध्ये तसेच अलिकडेच त्यांनी आम्ही सारे खवय्ये च्या शोमध्ये त्यांनी स्वत: आपली लव्हस्टोरी सांगितली होती. त्यावेळी किशोरी शहाणे यांनी म्हटलं, "जॅकी श्रॉफ हा माझा जुना मित्र होता. एक फॅन म्हणून मी आधी त्याला भेटले होते. त्यावेळी मी, माझी आई, फॅमिली त्याच्या शूटिंगला जायचो. तेव्हा मी आधीच नाटकांमध्ये काम करत होते. त्याने एकदा सांगितलं की, दीपक बलराज वीज हे हिंदीतील मोठे दिग्दर्शक आहेत. त्यांना चित्रपटातील अमुक एक पात्रासाठी मुलगी पाहिजे. तुला काम करायचं असेल तर बघ."
त्यानंतर किशोरी शहाणे म्हणाल्या, "मग मी आणि त्यांना भेटायला गेलो. तेव्हा जॅकीने ओळख करून दिली.तेव्हा फक्त एक अभिनेत्री, ते दिग्दर्शक म्हणून आमची ओळख झाली. पण, त्यांच्यामध्ये एक वेगळी पॉझिटिव्हीटी आहे. म्हणजे सिनेमातील एखादा सीन झाला की लगेच ते फर्स्टक्लास, व्हेरीगुड असं ते म्हणतात. तिथे मी थोडीशी विरघळले. मग त्यानंतर त्यांच्या माझ्या गप्पा सुरु झाल्या.सेटवर त्यांना पुस्तक वाचायची फार सवय.त्यांच्याकडे भरपूर पुस्तके असायची. नंतर मग देवाण-घेवाण अशी सुरु झाली की दिवाळीमध्ये मी त्यांच्या घरी जायचे.ते गणपतीला आमच्या घरी यायचे. त्यांच्याक़डे मला चमचमीत जेवण मिळायचं. त्यांना आमच्याकडे गोड पदार्थ मिळायचे. त्यामुळे आम्ही खूप आनंदी होतो." अशी किशोरी-दीपक यांची गोष्ट पुढे गेली. या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान त्यांच्यात मैत्री झाली आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले आणि त्यांनी लग्न केलं.
दीपक यांच्यामुळेच किशोरींना ‘बॉम्ब ब्लास्ट’ चित्रपटातही काम करायची संधी मिळाली. 'जान तेरे नाम', 'सैलाब' या चित्रपटांना एकेकाळी प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले होते. या चित्रपटाचे दिग्दर्शन दीपक बलराज वीज यांनी केलं होतं.
Web Summary : Kishori Shahane's love story is quite filmy. Jackie Shroff introduced her to director Deepak Balraj Vij. Their friendship blossomed during a film shoot, leading to marriage after sharing books, food, and Ganpati visits.
Web Summary : किशोरी शहाणे की प्रेम कहानी फिल्मी है। जैकी श्रॉफ ने निर्देशक दीपक बलराज विज से मिलवाया। किताबों, भोजन और गणपति दर्शन के आदान-प्रदान के बाद फिल्म की शूटिंग के दौरान उनकी दोस्ती शादी में बदल गई।