Join us
Daily Top 2Weekly Top 5

"स्त्रियांकडे वेगळ्याच नजरेने पाहिलं जातं...", गिरीजा ओकने मांडलं रोखठोक मत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2024 13:35 IST

मराठीसह बॉलिवूड गाजवणारी मराठमोळी अभिनेत्री म्हणजे गिरीजा ओक.

Girija Oak : मराठीसह बॉलिवूड गाजवणारी मराठमोळी अभिनेत्री म्हणजे गिरीजा ओक. आतापर्यंत तिने हिंदी, मराठी मालिकांसह सिनेमा, वेबसीरिजमध्येही काम केलं आहे. त्यामुळे तिचा चाहतावर्ग कमालीचा मोठा आहे. रंगभूमीवरही वेगवेगळे नाटकाचे प्रयोग करत तिने चाहत्यांच्या मनावर आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. सध्या गिरीजा तिने केलेल्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आहे. 

नुकतीच गिरीजाने 'आरपार' या यूट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत स्त्रियांच्या वर्कस्पेसबद्दल विविध मुद्यांवर भाष्य केलं आहे. 

काय म्हणाली गिरीजा?

या मुलाखतीत गिरीजा म्हणाली, "वर्कस्पेसमध्ये चांगलं बोलणाऱ्या तसेच हसून लगेच मैत्री करणाऱ्या स्त्रियांकडे उगाचंच एका वेगळ्याच नजरेने पाहिलं जातं, की ही सहज उपलब्ध असेल. पण मला असं वाटतं आपण आता या पलिकडे जायची गरज आहे. म्हणजे मी कोणाशीच  बोलू नये, मी कोणाशीच नीट वागू नये अशी एक सक्ती केली जाते. तर त्याकडे दुर्लक्ष करत मला चांगलं पण रहायचं आहे, पण मला समोरच्याला काही कल्पनाही द्यायची नाही आहे. पण खरं सांगायचं तर मी ही अशीच आहे, मी इतक्याच मनमोकळ्या गप्पा मारणारी आणि प्रेमाने सगळ्यांशी बोलणारीच व्यक्ती आहे". 

पुढे ती म्हणाली, "कारण मला खरंच असं वाटतं नाही की मी काहीतरी हातचं राखून, स्वत: काहीतरी ठेवून असं वागावं पण मला असं नाही वाटत. पण मी असं वागले तर अनेकांना वाटतं की अच्छा! ही तर खूप मोठ्या गप्पा बिप्पा मारते यार, कुठल्याही विषयावर बोलायला लागते. तर मला असं वाटतं याचे अनेक अनुभव येतात. त्याच्यामुळे मग मी हळूहळू बोलणं बंद करते किंवा कोषात जाते किंवा जेवढ्यास तेवढं ठेवते. पण मला असं वाटतं या पलिकडे पुरुषांनी आणि स्त्रियांनी सुद्धा यावं". असं स्पष्ट मत गिरीजाने या मुलाखतीत मांडलं. 

वर्कस्पेस-

अलिकडेच गिरीजा 'जवान' या चित्रपटामुळे चर्चेत होती. जवानमध्ये तिने बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच शाहरूख खानसोबत स्क्रीन शेअर केली होती. त्यानंतर 'व्हॅक्सीन वॉर' या चित्रपटामध्येही तिने केलेल्या कामाचं सर्वत्र कौतुक करण्यातं आलं. 

आमिर खानबरोबर ‘तारे जमीन पर’ आणि ‘शोर इन द सिटी’ या हिंदी चित्रपटात ती दिसली होती. गिरिजा ही ज्येष्ठ अभिनेते डॉ. गिरीश ओक यांची मुलगी आहे. 

टॅग्स :गिरिजा ओकमराठी चित्रपटबॉलिवूडसेलिब्रिटीजवान चित्रपट