Join us

घट्ट मिठी मारली, ढसाढसा रडली अन्...; 'दशावतार' पाहिल्यावर अभिनेत्याची पत्नी झाली भावुक, VIDEO बघाच!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2025 10:30 IST

'दशावतार' पाहिल्यावर अभिनेत्याची पत्नी झाली भावुक,  VIDEO होतोय व्हायरल...

Dashavtaar Movie: गेल्या काही दिवसांपासून मराठी सिनेसृष्टीत दशावतार या सिनेमाची जोरदार चर्चा सुरु होती. अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनी या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली आहे.मराठी सिनेमा प्रेक्षकांना सिनेमागृहात खेचून आणू शकत नाही, हे मत आता दिलीप प्रभावळकर यांनी बदलून टाकलं आहे. हा सिनेमा १२ सप्टेंबरला थिएटरमध्ये रिलीज करण्यात आला आहे.अवघ्या तीन दिवसांत दशावतारने बॉक्स ऑफिसवर आपला दबदबा निर्माण केला आहे. दरम्यान, या चित्रपटात अभिनेता सिद्धार्थ मेनने बाबुलीच्या मुलाची म्हणजेच दिलीप प्रभावळकर यांच्या मुलाची भूमिका साकारली आहे.अशातच सध्या सिद्धार्थ मेनचा सोशल मीडियावर व्हायरल होणार्‍या एका व्हिडीओने सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे. 

सध्या प्रेक्षक 'दशावतार' पाहण्यासाठी चित्रपटगृहांमध्ये तुफान गर्दी करत आहेत. चित्रपटाचं कथानक कोकणातील दशावताराची पार्श्वभूमी घेऊन येतो. कोकणच्या मातीची ऊब, खळखळ वाहणारं पाणी आणि हिरवा शालू नेसून नटलेली वसुंधरा डोळ्याचं  पारणं फेडणारी आहे.दरम्यान, अशातच अभिनेता सिद्धार्थ मेनन आणि त्याची पत्नीचा सिनेमागृहाच्या बाहेरील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. आपल्या पतीचं चित्रपटातील काम पाहून त्याची पत्नी भारावली असून थिएटरमधून बाहेर येताच ती ढसाढसा रडू लागते. या व्हिडीओमध्ये पौर्णिमा सिद्धार्थला मिठी मारून  रडत असल्याची पाहायला मिळतेय. 'Marathi Paparazzi' या अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. 

दरम्यान, 'दशावतार' सिनेमाची क्रेझ सर्वत्र पाहायला मिळतेय.  दिलीप प्रभावळकरांचा हा सिनेमा बॉलिवूड चित्रपटांवर भारी पडतोय. या चित्रपटात  सुनील तावडे, महेश मांजरेकर, सिद्धार्थ मेनन, अभिनय बेर्डे, प्रियदर्शनी इंदलकर, भरत जाधव, रवी काळे, विजय केंकरे, आरती वाडगबाळकर या सगळ्यांनीच त्यांच्या सहजसुंदर अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.

टॅग्स :दिलीप प्रभावळकर मराठी चित्रपटसोशल मीडियाव्हायरल व्हिडिओ