Join us
Daily Top 2Weekly Top 5

बॉलिवूडनंतर मराठी कलाकारही मुख्यमंत्र्यांच्या घरी दाखल, बाप्पाचं घेतलं दर्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2023 09:30 IST

अभिनेत्री स्पृहा जोशी, अमृता खानविलकर यांच्या सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल झाल्या आहेत.

सध्या देशभरात १० दिवस गणेशोत्सव जल्लोषात सुरु आहे. आज बाप्पाला निरोप देण्याची वेळ आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या वर्षा निवासस्थानी दोन दिवसांपूर्वी बॉलिवूड सेलिब्रिटींनी गणपतीचं दर्शन घेतलं होतं. तर काल मराठी कलाकार वर्षावर दाखल झाले. अभिनेत्री स्पृहा जोशी, अमृता खानविलकर यांच्या सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल झाल्या आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठी कलाकारांना काल वर्षा निवासस्थानी बाप्पाच्या दर्शनाचं आमंत्रण दिलं. स्पृहा जोशी, अमृता खानविलकर, सुकन्या मोने, श्रेया बुगडे, अक्षया देवधर, हार्दिक जोशी, मंगेश देसाई,शिवानी बावकर, स्वप्नील जोशी, भारत गणेशपुरे अशा या कलाकारांनी सोशल मीडियावर मुख्यमंत्र्यांसोबत फोटो शेअर केले आहेत. सर्व अभिनेत्री साडी नेसून मराठमोळ्या वेशभूषेत दिसल्या. 'आज माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांनी वर्षा बंगल्यावर गणपतीच्या दर्शनासाठी आमंत्रण दिले. त्यांचे मनापासून आभार. या निमिताने अनेक मित्रमंडळींची भेट झाली..' अशी पोस्ट स्पृहाने केली आहे.

बॉलिवूड सेलिब्रिटींनंतर मुख्यमंत्र्यांच्या घरी मराठी कलाकारांचाही गोतावळा पाहायला मिळाला. आज अनंत चतुर्दशी गणपतीचं विसर्जन आहे. साश्रुनयनांनी बाप्पाला निरोप द्यायचा आहे. मुंबई, पुण्यासह इतर शहरात मोठमोठ्या मिरवणुका निघणार असून यासाठीची जय्यत तयारी सगळीकडे दिसून येतेय.

टॅग्स :मराठी अभिनेतागणेशोत्सवएकनाथ शिंदेस्वप्निल जोशीस्पृहा जोशीअमृता खानविलकर