Join us
Daily Top 2Weekly Top 5

अभिनेत्री वनिता खरातने पायावर काढला टॅटू, व्हिडीओ शेअर करत म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2024 12:41 IST

अभिनेत्री वनिता खरात तिच्या अभिनयामुळे नेहमीच चर्चेत असते.

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्री वनिता खरात (Vanita Kharat) तिच्या अभिनयामुळे नेहमीच चर्चेत असते. तिचे अनेक चाहते असून 'महाराष्ट्राची हास्य जत्रा'मधून तिच्या विनोदांनी, भूमिकांनी तिने महाराष्ट्राला वेड लावलं. सध्या वनिता तिच्या भूमिकेमुळे नाही तर तिच्या नव्या टॅटूमुळे चर्चेत आली आहे.

वनिता सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. अभिनयाव्यक्तिरिक्त वैयक्तिक आयुष्यातले क्षणदेखील सोशल मीडियाद्वारे ती चाहत्यांबरोबर शेअर करत असते. नुकतेच तिने एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तिने उजव्या पायावर एक टॅटू काढलेला दिसत आहे. वनिताचा हा टॅटू खूपच खास आहे.

व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये वनिताने लिहलं, 'मोठ्या पडद्यासाठी कला निर्माण करणं हे माझे प्रेम आहे, परंतु सर्वोत्कृष्ट टॅटू कलाकाराने ही कला कायमस्वरूपी माझ्या शरीरावर कोरली आहे'.  वनिताच्या टॅटूमध्ये 'मुसाफिरा' असं लिहिलेलं असून झाडं आणि सूर्य पाहायला मिळत आहे. तिच्या या टॅटूची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.

वनिता खरात हे नाव आता कोणत्याही प्रेक्षकवर्गाला नवीन नाही. वनिताने मराठी मालिकांसह हिंदी सिनेमांमध्ये काम केले आहे. कबीर सिंह या बॉलिवूड सिनेमात ती झळकली होती. लवकरच वनिता 'येरे येरे पैसा ३' आणि 'गुलकंद' या चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. संजय जाधव दिग्दर्शित 'येरे येरे पैसा ३' हा चित्रपट १ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. 

टॅग्स :वनिता खरातसेलिब्रिटीसोशल मीडियामराठी अभिनेता