Join us

रात्रीस खेळ चाले: लग्नाच्या मिरवणुकीत अतरंगी डान्सनंतर वच्छीने शेअर केला नवा Video; पाहा तिचा भन्नाट अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2021 15:13 IST

Sanjivani patil: रात्रीस खेळ चाले या मालिकेत वच्छी ही भूमिका साकारून संजीवनीने प्रेक्षकांच्या मनात हक्काच स्थान निर्माण केलं.

ठळक मुद्देसंजीवनी पाटीलने 'पाहिले न मी तुला' या गाण्यावर एक व्हिडीओ शेअर केला आहे.

छोट्या पडद्यावरील तुफान गाजलेली मालिका म्हणजे रात्रीस खेळ चाले. या मालिकेतील कथानकासोबतच त्यातील काही कलाकारदेखील तुफान चर्चेत आले. यातलंच एक नाव म्हणजे अभिनेत्री संजीवनी पाटील. या मालिकेत वच्छी ही भूमिका साकारून संजीवनीने प्रेक्षकांच्या मनात हक्काच स्थान निर्माण केलं. विशेष म्हणजे आजही वच्छीचा लग्नातील मिरवणुकीचा डान्स प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. 

अतरंगी स्टाइलमध्ये डान्स करत वच्छीने तिच्या मुलाच्या लग्नाची वरात अण्णा नाईकांच्या वाड्यात आणली होती. तिच्या या डान्सने अनेकांची मनं जिंकून घेतली होती. त्यामुळे चाहते कायमच तिच्या डान्स व्हिडीओच्या प्रतीक्षेत असतात. वच्छीने म्हणजेच अभिनेत्री संजीवनी पाटीलने नुकताच तिचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.

सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असणाऱ्या संजीवनी पाटीलने 'पाहिले न मी तुला' या गाण्यावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती सुंदर एक्स्प्रेशन्स देत असून तिचा हा नवा अंदाजही प्रेक्षकांना भावला आहे.

दरम्यान, संजीवनी पाटील सोशल मीडियावर सक्रीय असून अनेकदा ती चाहत्यांच्या भेटीला येत असते. यात बऱ्याचदा ती त्यांच्या कुटुंबासोबतचे किंवा सेटवरील फोटो, व्हिडीओ शेअर करत असते.  

टॅग्स :टेलिव्हिजनसेलिब्रिटीटिव्ही कलाकारनृत्य