Join us

सलोना सा सजन है और..! सोनाली कुलकर्णीच्या सिंपल लूकची नेटकऱ्यांमध्ये चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2024 15:56 IST

Sonali kulkarni: सोनालीने हिरव्या रंगाची सुरेख साडी नेसली असून तिचा सिंपल लूक चर्चेत येत आहे.

मराठी कलाविश्वातील अभ्यासू आणि गुणी अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी (sonali kulkarni). आजवरच्या कारकिर्दीत सोनालीने अनेक गाजलेल्या सिनेमांमध्ये काम केलं आहे. अभिनयातील साधेपणा आणि पोटतिडकीने पडद्यावर तो अभिनय सादर करायची कला यांच्या जोरावर सोनालीने अपार लोकप्रियता मिळवली आहे. सिनेमांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणारी सोनाली सोशल मीडियाच्या माध्यमातूनही वरचेवर चाहत्यांच्या भेटीला येत असते.

सोनाली सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहे. त्यामुळे ती कायम तिच्या प्रोफेशनल लाइफविषयीचे अपडेट चाहत्यांसोबत शेअर करत असते. यामध्ये अलिकडेच तिने एक सुरेख फोटोशूट केलं असून त्याचा व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर केला आहे.

सोनालीने हिरव्या रंगाची सुरेख अशी काठापदराची साडी नेसली असून त्यावर हलकासा मेकअप केला आहे. तसंच हा लूक पूर्ण करण्यासाठी तिने गळ्यात लहानसं नेकलेस परिधान केलं आहे. सोबतच सलोना सा सजन हैं..और..एक मैं हूँ हे गाणं व्हिडीओसोबत प्ले केलं आहे. 

दरम्यान, सोनालीचा हा व्हिडीओ चाहत्यांच्या पसंतीस उतरला असून अनेकांनी त्यावर कमेंट आणि लाइक्सचा पाऊस पाडला आहे. सोनलीने आतापर्यंत गुलाबजाम,डॉ. प्रकाश बाबा आमटे,नटरंग, दिल चाहता हैं, कच्चा लिंबू, डॉ. काशिनाथ घाणेकर,मिशन कश्मीर, सिंघम अशा कितीतरी हिंदी, मराठी सिनेमांमध्ये ती झळकली आहे. 

टॅग्स :सोनाली कुलकर्णीसेलिब्रिटीसिनेमाबॉलिवूड