Join us
Daily Top 2Weekly Top 5

"सगळीकडे शेपूट बरोबर आहे…"; प्राजक्ताच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2022 15:43 IST

Prajaktta Mali: अलिकडेच तिच्या घरी एका चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. या नव्या पाहुण्याला तिने 'शेपूट' असं मजेशीर नावदेखील दिलं आहे.

अभिनेत्री प्राजक्ता माळी(prajakta mali)  हे नाव सध्याच्या घडीला कोणत्याही व्यक्तीसाठी नवीन नाही. मालिकांपासून करिअरची सुरुवात करणारी प्राजक्ता सध्याच्या घडीला अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये झळकत आहे. सध्या प्राजक्ता तिच्या रानबाजार या वेबसीरिजमुळे चर्चेत येत आहे. या सीरिजमध्ये पहिल्यांदाच प्राजक्ताचा बोल्ड अंदाज पाहायला मिळाला. त्यामुळे सोशल मीडियावर ती सातत्याने चर्चेत येत आहे. यामध्येच आता प्राजक्ताने एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने उन्हाळ्याच्या सुट्टीत तिच्या घरी आलेल्या नव्या पाहुण्याची ओळख चाहत्यांसोबत करुन दिली आहे.

सोशल मीडियावर सक्रीय असलेली प्राजक्ता बऱ्याचदा तिच्या प्रोफेशनल लाइफसोबत पर्सनल लाइफशी निगडीत गोष्टी, घडामोडीदेखील चाहत्यांसोबत शेअर करत असते. अलिकडेच ती तिच्या आजी-आजोबांना घेऊन सिनेमा पाहायला गेली होती. त्यानंतर आता तिच्या घरी एका चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. या नव्या पाहुण्याला तिने 'शेपूट' असं मजेशीर नावदेखील दिलं आहे.

"उन्हाळ्याच्या सुट्टीत पोरं “मामाच्या गावाला” जातात; ही “आत्तूच्या शहरी” आलीए. आजी आत्तूबरोबर एकटी दुबईला गेली होती म्हणून आजीला टूक टूक माकड करून ती आत्तूबरोबर एकटी मुंबईला आलीए. घ्या…शुटींग, इव्हेंट, योगा क्लास सगळीकडे शेपूट बरोबर आहे…", असं कॅप्शन देत प्राजक्ताने तिच्या भाचीसोबतचे काही फोटो शेअर केले आहेत.

दरम्यान, प्राजक्ताचं तिच्या भाच्यांवर असलेलं प्रेम साऱ्यांनाच ठावूक आहे. यापूर्वीही तिने अनेकदा सोशल मीडियावर तिच्या दोन लाडक्या भाच्यांसह फोटो पोस्ट केले आहेत. मात्र, यावेळी या फोटोमध्ये प्राजक्तासह तिची भाची याज्ञसेनी दिसून येत आहे. सध्या याज्ञसेनी सुट्टीमध्ये प्राजक्ताकडे राहायला आली असून सातत्याने ती प्राजक्तासोबत फिरताना दिसत आहे. 

टॅग्स :प्राजक्ता माळीसेलिब्रिटीसिनेमाटेलिव्हिजन