Join us

प्रिती झिंटाच्या गाण्यावर पूजाने केला जबरदस्त डान्स; हळदी सोहळ्यात 'Bumro'वर धरला ताल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2024 15:56 IST

Pooja sawant: पूजाचा लग्नापूर्वीचा प्रत्येक सोहळा आणि कार्यक्रम चांगलाच गाजताना दिसत आहे. या सोहळ्यांमधील अनेक फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखे व्हायरल होत आहेत.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री पूजा सावंत (pooja sawant) लवकरच लग्नाच्या बंधनात बांधली जाणार आहे. पूजा, सिद्धेश चव्हाण याच्यासोबत लग्नगाठ बांधणार असून सध्या तिच्या घरी लग्नाची धामधूम सुरु आहे. नुकताच पूजाचा संगीत, मेहंदी सोहळा पार पडला. त्यानंतर आता तिला सिद्धेशच्या नावाची हळद सुद्धा लागली आहे. या हळदी समारंभातील तिचा एक व्हिडीओ नुकताच समोर आला आहे.

 सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटो आणि व्हिडीओवरुन पूजाचा लग्नसोहळा मोठ्या धुमधडाक्यात होणार असल्याचं दिसून येत आहे. यामध्येच पूजाचा हळदी सोहळ्यातील एक व्हिडीओ समोर आला आहे. यात पूजाने प्रिती झिंटाच्या गाजलेल्या Bumro Bumro या गाण्यावर जबरदस्त डान्स केला आहे.

'मिशन कश्मीर' या सिनेमातील Bumro हे गाणं त्याकाळी प्रचंड गाजलं होतं. विशेष म्हणजे आजही अनेक जणांचं हे गाणं फेव्हरेट आहे. याच गाण्यावर पूजाने सुद्धा ताल धरला. पूजाने तिच्या हळदी सोहळ्यात या गाण्यावर जबरदस्त डान्स केला. विशेष म्हणजे तिचे एक्स्प्रेशन्स आणि प्रत्येक अदा उपस्थितांचं लक्ष वेधून घेत होती.

दरम्यान, पूजा आणि सिद्धेश यांच्या लग्नाला आता अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे त्यांच्या लग्नसोहळ्यापूर्वीच्या प्रत्येक कार्यक्रमाचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखे व्हायरल होत आहेत. 

टॅग्स :पूजा सावंतसिनेमासेलिब्रिटीप्रीती झिंटा