Join us

सावंतांची लेक झाली चव्हाणांची सून; दणक्यात पार पडला पूजा-सिद्धेशचा लग्नसोहळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 29, 2024 09:06 IST

Pooja sawant: मोठ्या दणक्यात पूजाचं लग्न झालं असून तिचा लग्नातील लूक सध्या तुफान चर्चेत येत आहे.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री पूजा सावंत  (pooja sawant) अखेर लग्नबंधनात बांधली गेली आहे. पूजाने सिद्धेश चव्हाण (siddhesh chavan) याच्यासोबत मोठ्या थाटामाटात लग्न केलं आहे. सध्या सोशल मीडियावर या लग्नसोहळ्याचे अनेक फोटो, व्हिडीओ वाऱ्यासारखे व्हायरल झाले आहेत. विशेष म्हणजे यावेळी पूजाचा रॉयल लूक चर्चेचा विषय ठरत आहे.

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर पूजा आणि सिद्धेश यांच्या लग्नसोहळ्याची जोरदार चर्चा रंगली होती. अगदी मेहंदी सोहळ्यापासून ते संगीत नाईटपर्यंत प्रत्येक सोहळा पूजा-सिद्धेशने मोठ्या दणक्यात सेलिब्रेट केला. त्यामुळे पूजाचं लग्नही असंच ग्रँड पद्धतीने होणार अशी चर्चा होती. विशेष म्हणजे खरोखरच पूजाचा लग्नसोहळा मोठ्या दिमाखात पार पडला.

पूजाचा लग्नसोहळा मोठ्या थाटात पार पडला असून या लग्नसोहळ्यात कुटुंबासह कलाविश्वातील अनेक दिग्गज कलाकार मंडळींनी हजेरी लावली होती. मराठीतल्या कलरफूलने अर्थात पूजाने लग्नात रॉयल लूकला पसंती दिली होती. हातात हिरवा चुडा, गळ्यात हेवी नेकलेस आणि भरजरी साडी असा गेटअप पूजाने केला होता. तर, सिद्धेशने काळ्या रंगाची शेरवानी परिधान केली होती.

दरम्यान,लग्न झाल्यानंतर पूजा आणि सिद्धेशने बाहेर येत चाहत्यांशी आणि मीडियाची संवाद साधला. तसंच त्यांना मिठाई देत तोंडही गोड केलं. पूजाच्या लग्नात अभिजीत व सुखदा खांडकेकर, प्रार्थना बेहेरे व तिचा पती अभिषेक जावकर, भूषण प्रधान, वैभव तत्त्ववादी, मृण्मयी देशपांडे, सिद्धार्थ चांदेकरसह अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होते. 

टॅग्स :पूजा सावंतसेलिब्रिटीटिव्ही कलाकारसिनेमा