Join us
Daily Top 2Weekly Top 5

'या' प्रसिद्ध अभिनेत्रीची लेक आहे सई गोडबोले; वडील सुद्धा आहेत व्यावसायिक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2023 18:25 IST

Sai godbole: सईच्या आईने अनेक गाजलेल्या सिनेमांमध्ये काम केलं आहे.

सई गोडबोले हे नाव सध्या कोणाला माहित नाही असं म्हणणारी क्वचित एखादी व्यक्ती सापडेल. अभिनेत्री, गायिका आणि डान्सर अशा कितीतरी कलागुणांमुळे ती ओळखली जाते. इतकंच नाही तर सई खासकरुन तिच्या वेगवेगळ्या भाषा बोलण्याच्या पद्धतीमुळे लोकप्रिय आहे. त्यामुळे सई आज सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय आहे. परंतु, लोकप्रियताम मिळवणारी ही मुलगी एका प्रसिद्ध अभिनेत्रीची मुलगी आहे हे फार क्वचित कोणाला ठावूक आहे.

सई एका प्रसिद्ध मराठमोळ्या अभिनेत्रीची लेक आहे. तर, तिचे वडील प्रसिद्ध व्यावसायिक आहेत. त्यांचा बिझनेस पार विदेशापर्यंत पोहोचला आहे. सई लोकप्रिय अभिनेत्री किशोरी गोडबोले हिची लेक आहे. किशोरीने मराठी कलाविश्वाचं ९० चं दशक चांगलंच गाजवलं आहे. 'फुल थ्री धमाल', 'खबरदार', 'कोहराम' आणि 'वन रूम किचन' यांसारख्या कितीतरी सिनेमा, मालिकांमध्ये तिने काम केलं आहे.

दरम्यान, सईच्या वडिलांचं दादरमध्ये गोडबोले फूड्स या नावाने एक दुकान आहे. विशेष म्हणजे दर दिवाळीमध्ये त्यांच्या दुकानातील फराळ विदेशात विकला जातो. तर, सईने अल्पावधीत कलाविश्वात तिचं स्थान निर्माण केलं आहे. सईने काही जाहिराती आणि सिनेमांमध्ये काम केलं आहे. 'फार मिलेंगे चलते चलते', 'इंतेजार' सारख्या चित्रपटात काम केलं आहे.

टॅग्स :किशोरी गोडबोलेटेलिव्हिजनसेलिब्रिटीसिनेमा