Join us

आलिया भटच्या गाण्यावर मराठी अभिनेत्रीचा लेकीसह धमाल डान्स; व्हिडीओ बघून तुम्हीही म्हणाल वा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2025 15:30 IST

माय-लेकीची जोडी कमाल! आलिया भटच्या गाण्यावर मराठी अभिनेत्रीचा मुलीसोबत गरबा डान्स; एनर्जी पाहून कराल कौतुक 

Kishori Godbole Video: सध्या नवरात्रोत्सवाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. प्रत्येकजण आपल्या परीने हा उत्सव साजरा करतो. नवरात्रोत्सवात गरबा नृत्याचं विशेष आकर्षण असतं. या उत्सवाची खरी धूम ही देवीच्या उपासनेसोबत रास दांडिया आणि गरब्यामध्ये पाहायला मिळते. असंख्य तरुण-तरुणी बेभान होऊन नाचत गरब्याच्या गाण्यावर ठेका धरतात. सध्या सोशल मीडियावर असे अनेक व्हिडीओ समोर येत आहेत. त्यात आता मराठी अभिनेत्री किशोरी गोडबोले आणि त्यांच्या लेकीचा गरबा डान्सचा व्हिडीओ चांगलाच चर्चेत आहे.

नुकताच सोशल मीडियावर किशोर गोडबोले यांनी गरबा डान्स करतानाचा सुंदर व्हिडीओ शेअर केला आहे.या व्हिडीओमध्ये त्यांच्यासोबत लेक सई देखील थिरकताना दिसते आहे. सध्या सोशल मीडियावर या मायलेकींचा हा व्हिडीओ नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. आलिया भटच्या गंगूबाई काठियावाडी चित्रपटातील 'ढोलिडा' गाण्यावर या मायलेकींनी ठेका धरला आहे. या व्हिडीओमध्ये या दोघीही खूप सुंदर डान्स स्टेप्स करताना दिसत आहेत. गरबा खेळतानाची त्यांची एनर्जी पाहून अनेकजण थक्क झाले आहेत. अभिनेत्री किशोरी गोडबोलेंनी हा व्हिडीओ त्यांच्या अधिकृत सोशल मिडिया अकाउंटवरून शेअर केला आहे.

दरम्यान, या व्हिडीओवर त्यांच्या चाहत्यांसह अनेक यूजर्सनी प्रतिक्रिया देत कौतुकाचा वर्षाव केला आहे. किशोरी गोडबोले आणि त्यांच्या लेकीचा हा जुना व्हिडीओ त्यांनी सोशल मीडियावर रि-शेअर केला आहे. त्यांच्या या व्हिडीओला अनेकांची पसंती मिळते आहे.

टॅग्स :किशोरी गोडबोलेनवरात्रीसोशल मीडियाव्हायरल व्हिडिओ