Join us
Daily Top 2Weekly Top 5

'मी तुझी आई शोभत नाही'; 'त्या' प्रसंगानंतर मराठी अभिनेत्रीला झाली कुटुंब दूर गेल्याची जाणीव

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2023 14:13 IST

Depti dev: आईचं बोलणं ऐकून दिप्तीच्या डोळ्यात टचकन पाणी आलं.

हिंदी व मराठी मालिकांमधून घराघरात पोहचलेली लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे दिप्ती देवी. मोजक्या पण दमदार भूमिका करुन दिप्तीने प्रेक्षकांच्या मनात हक्काचं स्थान निर्माण केलं. अलिकडेच तिने मित्र म्हणे या पॉडकास्टला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने तिच्या आईचा एक भावूक प्रसंग सांगितला. 'मी तुझी आई शोभत नाही', असं तिच्या आईने तिला सांगितलं. जे ऐकून दिप्तीच्या डोळ्यात टचकन पाणी आलं.

'मला सासू हवी' या मालिकेत काम करत असताना दिप्तीला मानाच्या पाच गणपतीचं दर्शन घ्यायला जायचं होतं. त्यामुळे ती आईला सोबत घेऊन जाणार होती. परंतु, तिच्या आईने सोबत येण्यास नकार दिला. आईने दिलेल्या या नकारामागचं कारण दिप्तीने या मुलाखतीमध्ये दिलं.

"एकदा माझी आई मला म्हणाली. ताई मी नाही येऊ शकत तुझ्यासोबत. मी तुझी आई शोभत नाही. विचार कर, त्यावेळी मला कसं वाटलं असेल. माझ्या हे लक्षात खूप लवकर आलं होतं. आताही मला बोलताना कसंतरी होतंय. तुमच्या माणसांना तुम्ही दूर गेला आहात हे वाटणं म्हणजे डोळ्यावरचा पडदा बाजूला झाल्यासारखं आहे", असं दिप्ती म्हणाली.

दरम्यान, दिप्तीची मला सासू हवी ही मालिका प्रचंड गाजली. या मालिकेव्यतिरिक्त तिने काही मराठी सिनेमांमध्येही काम केलं आहे. यात नाळ, कंडिशन्स अप्लाय', मंत्र, या सिनेमांमध्ये तिने काम केलं आहे.

टॅग्स :दीप्ती देवीसेलिब्रिटीटेलिव्हिजनसिनेमा