Bhagyashree Mote New House: २०२५ हे वर्ष अनेकांसाठी खास ठरलं आहे. कोणी नवी गाडी घेत तर कोणी हक्काचं खरेदी करत स्वप्न साकार केलं. यंदा दिवाळीच्या मुहूर्तावर अनेक कलाकारांचीही स्वप्नपूर्ती झाल्याची पाहायला मिळाली. अनुजा साठे, प्रियांका तेंडोलकर तसेच अभिनेता गंधार खरपुडीकर या मराठी कलाकारांनी हक्काची इच्छा पूर्ण झाली. दरम्यान, यांच्यापाठोपाठ आता आणखी एका मराठी अभिनेत्रीने नवं घर घेतल्याची माहिती चाहत्यांसोबत शेअर केली आहे.
'देवों के देव', 'सिया के राम', 'देवयानी' अनेक गाजलेल्या मराठी आणि हिंदी मालिका तसेच चित्रपटांमधून लोकप्रिय झालेल्या अभिनेत्री भाग्यश्री मोटेन दिवाळीच्या मुहूर्तावर हक्काचं घर घेतलं आहे. सोशल मीडियावर आपल्या नव्या घरातील गृहप्रवेशाचे फोटो शेअर करत अभिनेत्रीने सर्वांबरोबर ही आनंदाची बातमी शेअर केली आहे. भाग्यश्रीने मायानगरी मुंबईत हक्काचं घर घेतलं आहे. तिच्या नव्या घराच्या गृहप्रवेशाचे फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. त्यामध्ये या नवीन घरात भाग्यश्रीने विधीवत पूजा देखील केली. यावेळी तिच्या घरातील सदस्यांबरोबर काही मित्र-मैत्रिणी उपस्थित होते.
आपल्या अधिक़ृत इन्स्टाग्राम अकाउंटवर भाग्यश्री मोटेने खास पोस्ट शेअर करत त्यामध्ये लिहिलंय, "स्वप्नपूर्ती...! सुमारे १४ वर्षांपूर्वी मी मुंबईत येणं-जाणं सुरू केलं त्यावेळी राहायला जागा नसल्या कारणाने एका दिवसात येऊन, ऑडिशन्स देऊन, भेटीगाठी करून पुण्याला परत जावं लागायचं. आणि आजचा दिवस आहे ह्या स्वप्ननगरीच्या शहरात माझा हक्काचा घर झालंय. बाळ तू हवी होतीस, तुझी खूप आठवण येतीये, तुझ्या इतकं आनंदी आज दुसरा कोणी नसतं आणि तो आनंद बघण्याचा नशीब मला लाभलं असतं, असो असशील तिथे तू खूप खूश रहा आणि माझा अभिमान बाळगत असशील हे तर मला माहितीच आहे. खूप कृतज्ञ आहे, सगळ्यांनी इतकं प्रेम दिलं, साथ दिली. खूप खूप धन्यवाद आणि आभार. माझ्यावरचा प्रेम आणि समर्थन असंच राहू द्या!" दरम्यान, अभिनेत्रीने शेअर केलेल्या पोस्टवर मराठी कलाकारांसह तिच्या चाहतेमंडळींनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.