Chaitrali Gupte: अभिनेत्री चैत्राली गुप्ते मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय नायिका आहे. सध्या ती 'अशी ही जमवा जमवी' (Ashi Hi Jamva Jamvi) या चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा चित्रपट येत्या १० एप्रिल या दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अशोक सराफ वंदना गुप्ते, सुनील बर्वे तसेच चैत्राली गुप्ते या चित्रपटांत प्रमुख भूमिकांत दिसणार आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने दिलेल्या मुलाखतीमध्ये चैत्राली गुप्ते करिअरमधील रिजेक्शनविषयी भाष्य केलं.
नुकतीच चैत्राली गुप्तेने 'राजश्री मराठी'ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिला एखादं रिजेक्शन जिव्हारी लागलं आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्याबद्दल बोलताना चैत्राली गुप्ते म्हणाली, "रिजेक्ट नाही म्हणता येणार म्हणजे रिजेक्शनसाठी मी तिकडे गेलेच नाही. वादळवाटसाठी मला विचारण्यात आलं होतं. मला प्रचंड ताप आला होता. त्यावेळी त्यांनी खूप घाईमध्ये लूक टेस्ट आणि ऑडिशन करायची होती. मी अगदी उठूच शकत नव्हते. पण, ठीक आहे मला या गोष्टीचं दु: ख वगैरे काही नाही. माझी तब्येतच बरी नव्हती म्हणून या गोष्टी घडल्या. पण, मला मिळालं असतं तर आनंद नक्कीच झाला असता. हिंदीमध्ये झालंय असं की आपल्याकडे 'ये रिश्ता क्या कहलाता है' ही खूप वर्षे चालत आलेली मालिका आहे. त्याला दोन वर्षांपूर्वी मी ऑडिशन दिली होती आणि माझी मॉक शूटही झालं होता. आता सगळं काही होणार असं वाटत असताना ते नाही झालं."
रिजेक्शनचा खूप विचार करायचे...
पुढे अभिनेत्री म्हणाली,"पूर्वी मी रिजेक्शनचा खूप विचार करायचे, म्हणजे मी त्याच्यावर बरेच दिवस विचार करत बसायचे. त्याचा मला खूप त्रासही व्हायचा. माझा का विचार केला नसेल? असं का झालं असेल, मी त्यांना अशी दिसायला पाहिजे का? असा विचार करत मी बसलेली असायचे. असा खुलासा अभिनेत्रीने सांगितला.
वर्कफ्रंट
चैत्राली गुप्तेच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर, तिने 'स्वप्नांच्या पलीकडले', 'ऋणानुबंध', 'शुभं करोती' या मालिकांमध्ये अभिनय केलाय. चैत्रालीने पुढे हिंदी मालिकाविश्वात तिचा मोर्चा वळवला. 'ये रिश्ते है प्यार के', 'विद्रोही', 'इमली', 'पिया अलबेला' या हिंदी मालिकांमध्ये चैत्रालीने अभिनय केलाय.